लिव्ह-इनमध्ये रहाणं म्हणजे गुन्हा नव्हे - सुप्रीम कोर्ट
By admin | Published: July 23, 2015 01:39 PM2015-07-23T13:39:18+5:302015-07-23T13:51:07+5:30
लिव्ह-इन रिलेशनशिप हा समाजमान्य पायंडा ठरत असून लिव्ह-इनमध्ये रहाणं म्हणजे काही गुन्हा नव्हे असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि, २३ - आजकाल लिव्ह-इन रिलेशनशिप हा समाजमान्य पायंडा ठरत असून लिव्ह-इनमध्ये रहाणं म्हणजे काही गुन्हा नव्हे असे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. 'सध्या आधुनिक काळात लिव्ह-इन रिलेशनशिपला सर्वत्र मान्यता मिळत आहे, त्यामुळे तो काही गुन्हा ठरत नाही' असेही न्यायालयाने नमूद केले.
समाजातील प्रसिद्ध व्यक्तीचे लिव्ह-इन रिलेशनशिप स्टेटस उघड करणे हे बदनामीकारक ठरू शकते का असा प्रश्न सरकारला विचारतानाच न्या. दीपक मिश्रा व प्रफुल्ला. सी. पंत यांच्या खंडपीठाने हे मत नोंदवले.
समाजातील नागरिकांनी एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या आयुष्यात लक्ष घालू नये, त्यात जनतेचा कोणताही फायदा नसतो, असे उत्तर अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी दिले.
दरम्यान अविवाहीत महिलेला आपल्या पाल्याचे पालकत्व स्वीकारताना पाल्याच्या पित्याचे नाव उघड करणे बंधनकारक नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. पाल्याच्या पित्याचे नाव न सांगता ती महिला एकटीही मुलाची पालक होऊ शकते, असेही न्यायालयाने म्हटले होते.