लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार?

By admin | Published: January 6, 2015 10:17 AM2015-01-06T10:17:23+5:302015-01-06T11:16:07+5:30

भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि योगगुरू रामदेव यांनाही 'पद्म' पुरस्काराने गौरवण्यात येणार असल्याचे समजते.

LK Advani, Ramdev will get Padma awards? | लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार?

लालकृष्ण आडवाणी, रामदेव बाबांना मिळणार पद्म पुरस्कार?

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ६ -  केंद्र सरकारने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 'भारतरत्न' सन्मान जाहीर केल्यानंतर आता मोदी सरकार भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांचा 'पद्म' पुरस्काराने गौरव करणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पद्म पुरस्कारांच्या यादीत लालकृष्ण आडवाणी, तसेच योगगुरू बाबा रामदेव व प्रा, डेव्हिड फॉली यांच्या नावाचा समावेश आहे. विशेष  म्हणजे 'पद्म' पुरस्कारांसाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झालेले आहेत. 
बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिची 'पद्म' पुरस्कारासाठी शिफारस करण्याच्या मुद्यावरून वाद सुरू असतानाच या पुरस्कारासाठी आडवाणी व रामदेव बाबा यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यामुळे या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. क्रीडा मंत्रालयाने सोमवारी बॅटमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या नावाची शिफारस 'पद्मभूषण'साठी केली आहे.
सायना नेहवालची पद्मु पुरस्कारांसाठी शिफारस करण्यावरून वाद झाला होता. पद्मभूषण पुरस्कार न मिळाल्याने सायना नेहवालने दोन दिवसांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. आपणही पद्मभूषण पुरस्कारासाठी पात्र आहोत. पद्मश्री पुरस्कारानंतर पद्मभूषणसाठी पाच वर्षांची जी अट आहे ती मी देखील पूर्ण करते असे सांगत तिने केंद्रीय क्रीडा मंत्रालयावर नाराजी व्यक्त केली होती. सायनाने उघडपणे व्यथा मांडल्यावर  क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणाची दखल घेतली होती. 'पद्म' पुरस्कारांसाठी शिफारस करण्याची अंतिम तारिख लोटून सुमारे चार महिने झाले तरीही सोमवारी क्रीडा मंत्रालयाने गृह मंत्रालयाकडे सायनाच्या नावाची शिफारस केली. 
 

Web Title: LK Advani, Ramdev will get Padma awards?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.