LMOTY 2020: केंद्राच्या नियमावलीचे 'ओटीटी' मंचाच्या प्रतिनिधींकडून स्वागत: प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 06:38 PM2021-03-16T18:38:19+5:302021-03-16T18:41:24+5:30

lmoty 2020 - ओटीटी दर्शकांचा अनुभव आणखी सुखद व चांगला करण्यासाठी ओटीटी मंच आणि केंद्र सरकार एकत्रितरित्या काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली.

lmoty 2020 prakash javadekar says ott industry and govt will work together to improve audience experience | LMOTY 2020: केंद्राच्या नियमावलीचे 'ओटीटी' मंचाच्या प्रतिनिधींकडून स्वागत: प्रकाश जावडेकर

LMOTY 2020: केंद्राच्या नियमावलीचे 'ओटीटी' मंचाच्या प्रतिनिधींकडून स्वागत: प्रकाश जावडेकर

Next
ठळक मुद्देप्रकाश जावडेकर यांची लोकमतच्या कार्यक्रमाला उपस्थितीओटीटी उद्योग आणि सरकार एकत्रितपणे काम करणारओटीटी मंचाला तक्रार निवारण्यासाठी व्यवस्था करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : ओटीटी दर्शकांचा अनुभव आणखी सुखद व चांगला करण्यासाठी ओटीटी मंच आणि केंद्र सरकार एकत्रितरित्या काम करत आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी दिली. ते 'लोकमतच्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2020' या कार्यक्रमात बोलत होते. ओटीटीवरील कार्यक्रमांच्या सेन्सरशिपपेक्षा विषयांचे वर्गीकरण करण्यावर विचार सुरू आहे, असे जावडेकर यांनी सांगितले. (lmoty 2020 prakash javadekar says ott industry and govt will work together to improve audience experience)

नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार आणि अल्ट बालाजी यांसारख्या ओटीटी मंचाच्या प्रतिनिधींशी एक बैठक झाली. या बैठकीत केंद्र सरकारची नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ओटीटी नियमावलीतील तरतुदी या प्रतिनिधींसमोर मांडण्यात आल्या. ओटीटी मंचाच्या प्रतिनिधींनी स्वागत केले, असे जावडेकर यांनी सांगितले.

LMOTY 2020: देशाची खरी ताकद बडे नेते नाहीत, तर सामान्य जनता आहे: अरविंद केजरीवाल 

ओटीटी मंचावरील दर्शक आणि युझर्स यांचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी सरकार आणि ओटीटी मंच एकत्रितपणे काम करेल. सदर ओटीटी मंचाच्या प्रतिनिधींशिवाय जिओ, जी५, वायकॉम १८, शेमारू आणि मॅक्सप्लेयर यांच्याशीही बैठक घेऊन चर्चा करण्यात आली, असे जावडेकर म्हणाले. 

ओटीटी मंचाकडून वेगळी व्यवस्था केली जाईल. स्वनियमनच्या माध्यमातून सर्वांसाठी ती समान व्यवस्था असेल. चित्रपट आणि टीव्ही प्रतिनिधींनी भेट घेऊन ओटीटीसाठी नियमन करण्याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर यासंदर्भात काही बैठका, चर्चा करून पुढे निर्णय घेण्यात येणार आहे, असे जावडेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.

२५ फेब्रुवारी रोजी ओटीटी मंच आणि डिजिटल मीडिया यांना नवीन नियमांसंदर्भात माहिती देण्यात आली. या तरतुदींनुसार, त्यांना माहिती सार्वजनिक करणे आणि तक्रार निवारणासाठी व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ओटीटी मंचाच्या प्रतिनिधींनी सरकारचे आणि मंत्रालयाचे आभार मानले. ओटीटी उद्योगाच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मंत्रालय नेहमी तयार असेल, असे आश्वासन दिल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: lmoty 2020 prakash javadekar says ott industry and govt will work together to improve audience experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.