LMOTY 2020: गरिबांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा लोकमतकडून सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:21 PM2021-03-16T17:21:22+5:302021-03-16T17:23:51+5:30

Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020: १० लाख लोकांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार 2020'नं गौरव

LMOTY 2020 sajjan jindal felicitated with maharashtrian of the year award 2020 | LMOTY 2020: गरिबांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा लोकमतकडून सन्मान

LMOTY 2020: गरिबांना मदत करणाऱ्या सज्जन जिंदाल यांचा लोकमतकडून सन्मान

Next

नवी दिल्ली: देशातील दुसरी मोठी स्टील कंपनी जेएसडब्ल्यू स्टीलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदाल यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर पुरस्कार 2020' नं (Lokmat Maharashtrian of The Year Awards 2020) सन्मान करण्यात आला आहे. जिंदाल यांच्या फाऊंडेशननं जवळपास दहा लाख लोकांची मदत केली होती. त्यासाठी लोकमतकडून जिंदाल यांना गौरवण्यात आलं. 

पुढच्या दोन वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांच्या बरोबरीत आणणार- नितीन गडकरी

सज्जन जिंदाल मोठ्या औद्योगिक घराण्याशी संबंधित आहेत. जिंदाल देशातले प्रख्यात उद्योगपती ओ. पी. जिंदाल आणि सावित्री जिंदाल यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे माजी खासदार नवीन जिंदाल यांचे लहान भाऊ आहेत. बंगळुरूतल्या एम. एस. रमय्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून सज्जन जिंदाल यांनी पदवी घेतली आहे. त्यानंतर त्यांनी कुटुंबाच्या उद्योगाची जबाबदारी खांद्यावर घेतली. जिंदाल समूहाच्या मालमत्तेचं मूल्य १४ हजार ७०० कोटी रुपये इतकं आहे. स्टील, ऊर्जेसह अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये जिंदाल समूह कार्यरत आहे. फोर्ब्सच्या आकडेवारीनुसार, जिंदाल परिवाराकडे ५.१ बिलियन डॉलरची संपत्ती आहे.

Web Title: LMOTY 2020 sajjan jindal felicitated with maharashtrian of the year award 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.