एलओसीजवळ पुन्हा दहशतवादी शिबिरांमध्ये वाढ

By admin | Published: May 3, 2017 09:28 AM2017-05-03T09:28:05+5:302017-05-03T11:12:30+5:30

भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.

The LoC again increased in terrorist camps | एलओसीजवळ पुन्हा दहशतवादी शिबिरांमध्ये वाढ

एलओसीजवळ पुन्हा दहशतवादी शिबिरांमध्ये वाढ

Next

 ऑनलाइन  लोकमत

नवी दिल्ली, दि. 3 - भारतीय लष्कराने सप्टेंबर 2016 साली पाकव्याप्त काश्मीर येथे केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर ताबा रेषेलगत पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांचा पुन्हा सुळसुळाट वाढल्याचे वृत्त समोर आले आहे.  जवळपास दहशतवादी संघटनांनी 20 नवीन अड्डे उभारले आहेत, अशी माहिती भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला अगदी खेटून काही अड्डे अस्तित्वात असून, नवीन अड्ड्यांसह दहशतवाद्यांच्या एकूण अड्ड्यांची संख्या 35 ते 55च्या घरात पोहोचली आहे. हे सर्व अड्डे भारतविरोधी दहशतवादी कारवायांत सक्रिय आहेत. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या जवळपास 55 दहशतवादी संघटनांचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहेत. या शिबिरामध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात असून त्यांना भारतविरोधी कारवाया करण्यासाठी तयार केले जात आहे. पाकिस्तानातील वेगवेगळ्या दहशतवादी संघटना येथे आपले प्रशिक्षण शिबिर चालवत आहेत.  सप्टेंबर 2016 मध्ये भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर बिथरलेल्या 55 पैकी 35 दहशतवादी शिबिरांनी आपला गाशा गुंडाळत ठिकाणं बदलली होती. पण सध्या या दहशतवादी संघटनांनी आपला मुक्काम पुन्हा आधीच्या ठिकाणी हलवल्याचे वृत्त आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्ष 2017च्या सुरुवातीला 4 महिन्यांमध्ये दहशतवाद्यांनी जवळपास 60 वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यातील 15 दहशतवाद्यांचा भारतव्याप्त काश्मीरच्या सीमेजवळ घुसखोरी करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. गुप्तचर संस्थाच्या हवाल्याने माहिती देत एका अधिका-याने सांगितले की, काश्मीर खो-यात आताच्या घडीला जवळपास 160 दहशतवादी सक्रीय आहेत. या दहशतवाद्यांच्या पाकिस्तानातील म्होरक्याने त्यांना भारतीय सुरक्षा दलांविरोधात हल्ले वाढवण्याचे निर्देश दिल्याचीही माहिती आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून काश्मीर खो-यातील तरुणांनाही त्यांच्या संघटनांमध्ये सामील करुन घेतले जात आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीर खो-यातील जवळपास 100 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचे म्हटले जात आहे. 
 
हाती आलेल्या माहितीनुसार, दहशतवादी संघटना सुरक्षा दलांवरील हल्ले वाढवून आपल्या सदस्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर सोमवारी जम्मू-काश्मीर बँकेच्या कॅश व्हॅनवर कुलगामजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन बँक कर्मचारी व पाच पोलीस असे सात जण ठार झाले. दहशतवाद्यांनी 50 लाख रुपये आणि शस्त्रे घेऊन पळ काढला. या हल्ल्याची जबाबदारी हिजबुल मुजाहिद्दीनने स्वीकारली. मात्र नंतर यासाठी हिजबुल मुजाहिद्दीनने सीआरपीएफला दोषी ठरवलं. यामागील कारण म्हणजे सीआरपीएफबाबत स्थानिक नागरिकांच्या मनात द्वेष पसरवून सीआरपीएफला खलनायक बनवणे, हा या दहशतावाद्यांचा उद्देश आहे. जेणेकरुन स्थानिक संतापल्याने ते स्वतः भारतीय जवानांविरोधात निदर्शन करुन आपला रोष व्यक्त करतील. यापूर्वी रविवारी श्रीनगरच्या खानयार पोलीस ठाण्यावर हल्लेखोरांनी ग्रेनेडचा मारा केला. त्यात चार पोलीस जखमी झाले; तर एका नागरिकाचा मृत्यू झाला.
 
दहशतवाद्यांनी पुन्हा लुटली बँक 
तर मंगळवारी (2 मे) कुलगाम जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांनी पुन्हा बँक लुटल्याची घटना मंगळवारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कुलगाम जिल्ह्यातील कादर येरीपोरा परिसरात असलेल्या इलाकाई देहाती बॅंकेत दोन दहशतवाद्यांनी दरोडा टाकला. या दरोड्यात 65, 000 रुपयांची रोकड लुटून पोबारा केला. 

Web Title: The LoC again increased in terrorist camps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.