एलओसीवरील रहिवाशांना बंकर हवेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 01:32 AM2017-09-13T01:32:41+5:302017-09-13T01:32:41+5:30
पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
नौशेरा : पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
मागील चार महिन्यांपासून राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील २३ वस्त्यांमधील ५ हजारपेक्षा अधिक नागरिकांना भीतीपोटी घरदार सोडावे लागले आहे.
गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या काश्मीर दौºयात या रहिवाशांनी त्यांची भेट घेऊन वैयक्तिक बंकर बनवून देण्याची मागणी केली. जनगढचे रहिवासी पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा नियंत्रण रेषेवर राहायचे असेल, तर सीमेवरील प्रत्येक घरामध्ये बंकर बनवून द्यावे. सीमा शरणार्थी समन्वय समितीचे अध्यक्ष असलेले कुमार म्हणाले की, आम्हाला भोजनापेक्षा बंकरची जास्त गरज आहे. (वृत्तसंस्था)