सौदी अरेबियाच्या 'या' निर्णयामुळे भारतीयांना बसणार मोठा धक्का;अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 12:06 PM2022-10-13T12:06:11+5:302022-10-13T12:13:31+5:30
सौदी अरेबियाच्या नोकरी क्षेत्रात पुढील वर्षात मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियामध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे.
सौदी अरेबियाच्यानोकरी क्षेत्रात पुढील वर्षात मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियामध्येनोकरी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. पुढील वर्षी २०२३ पासून सल्लागार व्यवसायातील ३५ टक्के नोकर्या स्थानिक लोकांना देण्यात येतील. या दुसऱ्या टप्प्यात ते ४० टक्के करण्यात येणार आहेत, असं अरेबियाच्या मानव संसाधन आणि सामाजिक विकास मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले.
या निर्णयामुळे सौदीमधील भारतीयांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. स्थानिक लोकांना ४० टक्के जागा आरक्षित करण्यात येणार असून एप्रिल २०२३ पासून पहिल्या टप्प्यात ३५ टक्के जागा आरक्षित करण्यात येणार. यानंतर २०२४ मध्ये ४० टक्के करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
राजकारण तापलं! "छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे सोनिया गांधींचे ATM"; भाजपाचा गंभीर आरोप
सौदी अरेबियामध्ये नोकरी करणाऱ्यांमध्ये भारतीयांच्या संख्या जास्त आहे. सौदीमध्ये भारतीय तरुणांची हॉटेल आणि खाण क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. आता सौदीमध्ये स्थानिकांना आरक्षण लागू केले असल्यामुळे भारतीयांच्या नोकऱ्या कमी होणार आहेत. भारतातून लाखो तरुण सौदीमध्ये नोकरीसाठी जातात.परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सौदीमधून १ लाख १८ हजार पेक्षा जास्त तरुण कोरोना काळात भारतात परत आले आहेत.
सौदी अरेबियामध्ये बेरोजगारीदर ९ टक्क्यांवर आहे. त्यामुळे आता देशातील तरुणांना जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सौदीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा थेट परिणाम आर्थिक सल्लागार विशेषज्ञ, व्यवसाय सल्लागार आणि प्रकल्प व्यवस्थापन विशेषज्ञ यांसारख्या क्षेत्रांवर होणार आहे. अर्थमंत्री मुहम्मद अल-जदान यांनी सल्लागार व्यवसायाच्या सेवा अटींमध्ये सुधारणा जारी केली आहे, सर्व कंपन्यांना स्थानिकीकरणाची टक्केवारी निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत.