Unlock 1: मुहूर्त ठरला!... पहिल्या टप्प्यात उघडणार धार्मिक स्थळं, मॉल अन् हॉटेल्सचं दार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2020 07:49 PM2020-05-30T19:49:01+5:302020-05-30T20:40:02+5:30
तसेच रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार असून, शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
नवी दिल्लीः केंद्र सरकारनं देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयांकडून याचे दिशानिर्देश प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले असून, प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात प्रार्थना स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सुरू होणार आहेत. येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरू करण्याची सशर्त परवानगी दिली आहे. रेड झोन बाहेर 8 जूनपासून मंदिर, मशीद ही धार्मिक स्थळं उघडणार आहेत. तसेच रेड झोन बाहेर 8 जूनपासून रेस्टॉरंट, हॉटेल्सही उघडणार असून, शॉपिंग मॉल्सनाही उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
राज्यांतर्गत वा राज्या-राज्यांत सर्व दळणवळणावर आता कोणतीही बंदी नाही. कसलीही परवानगी किंवा मंजुरी व ई-परमिटची गरज नाही. दळणवळणासंबंधीच्या निर्णयाचे राज्यांना अंतिम अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रे राज्यांनाच ठरवता येणार आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तसेच केंद्र सरकार हे राज्य सरकारांशी विचारविनिमय करून शाळा सुरू करण्यासंबंधीचा निर्णय जुलैमध्ये घेऊ शकते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा 24 मार्चला रात्री लॉकडाऊनची घोषणा केली होती. तो लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत पुढे वाढवण्यात आला होता. त्यात वाढ करून तो तीन मेपर्यंत पुढे वाढवण्यात आला. त्यानंतरही भारतातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं हा लॉकडाऊन 17 मेपर्यंत आणि त्यानंतर 31 मेपर्यंत वाढवण्यात आला. आता पाचव्या टप्प्यात 1 जून ते 30 जूनपर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.#FLASH: Government issues new guidelines for phased re-opening of all activities outside containment zones for the next one month. Details to follow. #UNLOCK1pic.twitter.com/g8CCnX23Hh
— ANI (@ANI) May 30, 2020
#UNLOCK1: MHA issues national directives for #COVID19 management, including compulsory use of face masks and social distancing norms pic.twitter.com/ESopuVdeu9
— ANI (@ANI) May 30, 2020
हेही वाचा!
Lockdown 5.0 : केंद्राची नवीन नियमावली प्रसिद्ध; जाणून घ्या कोणती सूट मिळणार अन् कशावर बंदी
जैन समाजाच्या साधू-साध्वींना प्रवास करण्यास सरकारची परवानगी, पण 'हे' नियम पाळावे लागणार
CoronaVirus: अनर्थ टळला! एअर इंडियाचं विमान आकाशात असतानाच वैमानिक पॉझिटिव्ह निघाला अन्...