लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:29 AM2020-04-21T00:29:50+5:302020-04-21T00:31:33+5:30

अत्यावश्यक सेवांची वाहनेच रस्त्यावर; देशभरातील रस्त्यांवर शुकशुकाट असल्याचा परिणाम

Lockdown brings down rate of road accidnet | लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांना लागला ब्रेक

Next

- भावेश ब्राह्मणकर 

नवी दिल्ली : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे देशातील रस्ते अपघातांनाही ब्रेक लागला आहे. अत्यावश्यक सेवांचा परवाना दिलेली वाहनेच रस्त्यावर धावत असून त्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. महानगरांमध्येही शुकशुकाट असल्याने रस्ते अपघातांची किरकोळ नोंद झाली आहे.

जसे लॉकडाऊन जाहीर झाले आहे तसे देशात रस्ते अपघातांचे प्रमाण नगण्य झाले आहे. सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद आहे, तर केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वाहनांचा वापर केला जात आहे. रस्ते सामसूम असल्याने या वाहनांच्या रहदारीला कुठलाही अडथळा नाही. त्यामुळेच रस्ते अपघात होत नसल्याचे दिसून येत आहे. देशात एकूण ७३६ जिल्हे आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
दिल्ली, मुंबई, कोलकातासारख्या मोठ्या महानगरांमध्ये जिथे वाहतूक कोंडी होते तिथे आता रस्त्यावर चिटपाखरूही नसल्याचे दिसून येत आहे.
देशात सर्वाधिक रस्ते अपघात हे राजधानी दिल्लीत होतात. सरासरी पाच जणांचा दिल्लीत बळी जातो, अशी सरकारी नोंद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने हे प्रकार प्रामुख्याने घडतात, असे दिल्ली वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

१५ ते ३१ मार्चदरम्यान दिल्लीत केवळ १९ रस्ते अपघातांची नोंद आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ही संख्या ४८ एवढी होती. राजधानीत गेल्या २० दिवसांतही तुरळक अपघात झाले आहेत. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही अशीच स्थिती आहे. असेच चित्र अन्य महानगरांमध्येही आहे. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये ज्या काही अत्यल्प अपघातांची नोंद आहे त्यात रस्त्याने पायी जाणाऱ्या मजुरांचा वाहन धडकल्याने बळी गेला आहे.

कोणत्या वर्षी किती अपघात?
2017 मध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार देशात ४ लाख ६४ हजार ९१० तर २०१८ मध्ये ४ लाख ६७ हजार ४४ अपघात झाले.
2018 मध्ये रस्ते अपघातात १ लाख ५१ हजार ४७१ जणांचा बळी गेला. देशभरातील रस्त्यांमध्ये १.९४ टक्के हे राष्ट्रीय महामार्ग तर २.९७ टक्के हे राज्य महामार्ग आहेत. राष्ट्रीय महामार्गावर सर्वसाधारणपणे ३० टक्के अपघात होतात, तर मृतांचे प्रमाण ३५.७ टक्के एवढे आहे, तर राज्य महामार्गावर हीच स्थिती २५.२ टक्के अपघात आणि २६.८ टक्के मृत्यूदर एवढी आहे.

95.1 टक्के रस्त्यांवर तब्बल ४५ टक्के अपघात होतात. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग वगळता तेथील मृतांची संख्याही ३८ टक्के आहे. मृतांमध्ये १५ टक्के हे पादचारी असतात. २.४ टक्के हे सायकलस्वार, तर ३६.५ टक्के दुचाकीस्वार असतात. १८ ते ४५ वय असलेले ६९.६ टक्के जण हे रस्ते अपघातात ठार होतात.

Web Title: Lockdown brings down rate of road accidnet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.