Lockdown : ITBPच्या जवानाचं 'हे' कोरोनागीत तुमच्या हृदयाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 03:42 PM2020-04-29T15:42:17+5:302020-04-29T16:03:57+5:30
केवळ 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे.
नवी दिल्ली : कोरोनाला हरवण्यासाठी देशात सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. अशातच इंडियन तिबेट सीमा पोलीसचे (आयटीबीपी) जवान हेड कॉन्स्टेबल अर्जुन खेरियल यांनी अक्षय कुमारच्या केसरी चित्रपटातील ‘तेरी मिट्टी...’ हे गीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गायले असून ते देशतील कोरोना वॉरियर्सना समर्पित केले आहे. 3 मिनिट 31 सेकंदांच्या या गीतात अर्जुन यांनी, आयटीबीपीची कोरोनाविरोधातील लढाई शब्दात मांडली आहे. याच बरोबर, त्यांनी हे गीत सर्व संरक्षण कर्मचारी, पोलीस दल आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह कोरोनाचा सामना करणाऱ्या सर्वांना समर्पित केले आहे.
आयटीबीपीनेच तयार केले होते देशातील पहिले क्वारंटाइन सेंटर -
कोरोनाचा देशात प्रसार होण्यापूर्वीच आयटीबीपीने देशातील पहिले 1000 बेटचे क्वारंटाइन सेंटर नवी दिल्ली येथील छावला भागात सुरू केले होते. येथे वेगवेगळ्या दलांतील जवळपास 1200 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. यात 7 मित्र देशांचे 42 नागरिकही सहभागी होते. यातील अधिकांश लोकांना वुहान, चीन, मिलान, रोम आणि इटलीतून आणण्यात आले होते.
वय फक्त 4 वर्ष; भारतीय वंशाच्या चिमुकलीनं आधी 'कॅन्सर' अन् आता 'कोरोनावर' केली मात
ए देश मेरे तू जीता रहे...
— ITBP (@ITBP_official) April 29, 2020
आईटीबीपी जवान अर्जुन खेरियल द्वारा देश के कोरोना योद्धाओं को समर्पित
Dedicated to #CoronaWarriors by ITBP jawan Arjun Kheriyal#Covid19#ITBP
A TRIBUTE | Arjun kheriyal ft. Honey sandhu | B praak | Arko | Manoj Muntashir I Honey Sandhu Sandbeat studios pic.twitter.com/MphAPmwi6h
पीपीई किटची समस्या दूर करण्यासाठीही ITBPची भूमिका मोठी -
आयटीबीपीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली संसाधने वापरूनच पीपीई किट आणि मास्कदेखील तयार केले. एवढेच नाही, तर अनेक संघटनांना ते निःशुल्क वितरितही केले. लॉकडाउनच्या काळात आयटीबीपीने देशातील दुर्गम भागांमध्ये जाऊन रसद आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यातही मोलाचा वाटा उचलला. याशिवाय, हजारो लोकांना भोजन आणि इतर सामग्रीही उपलब्ध करून दिली.
किम जोंगनंतर बहीण नव्हे, 'हे' बनू शकतात उत्तर कोरियाचे हुकूमशहा; संपूर्ण जग म्हणतं 'जल्लाद'!
आयटीबीपीच्या या गाण्यात भावुकता, राष्ट्र प्रेम आणि आत्मविश्वासाची झलक -
आयटीबीपीच्या जवानाने गायलेल्या या गाण्यात भावुकता, राष्ट्र प्रेम आणि आत्मविश्वासाची झलक पाहायला मिळते. या गीतातून आयटीबीपीसह सर्वच केंद्रीय दलांमधील राष्ट्रीय आपत्तीच्या काळातील साहस, त्याग आणि बलिदानही दिसून येते. हे गीत गीतकार मनोज मुन्तशिर यांनी लिहिले आहे.
...तर एका वर्षात तयार होऊ शकते कोरोनाची लस, बिल गेट्स यांचा मोठा दावा