Lockdown News: मालवाहतूक तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष; तात्काळ होणार निवारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:58 PM2020-05-06T23:58:24+5:302020-05-06T23:58:33+5:30

दोन हेल्पलाईनचाही उपयोग सुरू : केवळ अत्यावश्यक वस्तूंचीच होणार वाहतूक; ई-पासही दिले

Lockdown News: Control Room for Freight Complaints; Immediate remediation | Lockdown News: मालवाहतूक तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष; तात्काळ होणार निवारण

Lockdown News: मालवाहतूक तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष; तात्काळ होणार निवारण

Next

नवी दिल्ली : रिकाम्या आणि मालवाहू वाहनांच्या दळणवळणसंदर्भात वाहतूकदारांच्या तक्रारी, तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाचा वापर सुरू झाला आहे. तसेच, गृहमंत्रालयाची हेल्पलाईन १९३० आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हेल्पलाईन १०३३ हीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यासाठी वाहनांना ई-पासही दिले जात
आहेत. लॉकडाऊन काळात देशांतर्गत आंतरराज्य मालवाहतूक करण्यासाठी काही रिकामे ट्रकही ये-जा करतात. याच काळात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासंदर्भात विविध राज्यांमधून तक्रारी प्राप्त होत आहेत. अनेक ट्रकची अडवणूक केली जाते तर काहींना अनेक तासांनंतर परवानगी दिली जाते. तर, काही ट्रकला जवळपास सर्वच राज्यांच्या पोलिसांचा सामना करावा लागत आहे. याची दखल घेण्यात आली असून, या सर्व वाहतूकदारांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिल्लीतील नियंत्रण कक्षाचा उपयोग सुरू करण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे अधिकारीही या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहेत.

1930, 1033 हेल्पलाईन नंबर

लॉकडाऊन काळात वाहतूकदारांच्या तक्र ारींसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाचा नियंत्रण कक्ष क्र मांक म्हणजेच १९३० हा क्र मांक चालक आणि वाहतूकदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित तक्र ारींसाठी एनएचएआय हेल्पलाईन क्रमांक १०३३ हासुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे वाहतूक विभाग, वाहतूक संघटना, चालक आणि वाहतूकदारांना माहिती पुरविण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात आली आहेत.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातून केंद्रीय गृहमंत्रालय नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आलेले अधिकारी वाहतूक क्षेत्र आणि चालकांशी संबंधित तक्रारींचे निराकरण करीत आहेत. गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांना अनुसरूनच करण्यात येत आहे.

Web Title: Lockdown News: Control Room for Freight Complaints; Immediate remediation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.