Lockdown News: "शहरातील 'त्यांना' बाहेरचे समजतात अन् गावात कोरोनाच्या भीतीनं प्रवेश मिळत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 10:22 AM2020-05-11T10:22:58+5:302020-05-11T10:28:33+5:30
जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी सरकारने देशव्यापी लॉकडाउन जाहीर केले असले तरी त्याचा सर्वाधिक फटका हा हातावर पोट असणाऱ्या मजुरांना बसत आहे. हाताला कोणतेही काम नसल्यामुळे त्यांचे शहरांमध्ये राहणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आपल्या गावी परतत आहेत. जेएनयूचे माजी विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी कामगारांच्या या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कन्हैया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, परप्रांतीय मजुरांना शहरातील नागरिक बाहेरचे म्हणतात आणि खेड्यातून स्थलांतर केल्यामुळे ते तिथे परदेशी होतात. लॉकडाऊनमुळे त्यांना शहरात राहण्याची सोय नाही आणि साथीच्या भीतीमुळे त्यांना गावात प्रवेश दिला जात नाही, स्वत:च्या देशात या प्रवासी बनलेल्या मजुरांची अशी व्यथा आहे.
तसेच यापूर्वी कन्हैय्या कुमार यांनी ट्विटरद्वारे कोरोना आणि त्यावरील परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. दुर्घटनाग्रस्त कामगारांवरून त्यानं मोदी सरकार व समाजाला प्रश्न विचारला होता. त्यांनी लिहिले होते की, कोरोनाचा समाजातील एका मोठ्या घटकावर वाईट परिणाम झाला आहे. विशेषत: गरीब आणि मजुरांसाठी हा जगण्याचा आणि मरणाचा प्रश्न बनला आहे. घरी परतण्याच्या धडपडीत कामगार सतत आपला जीव गमावत आहेत. सत्ता आणि समाजाने त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे अन्यथा मानवतेबद्दलचे आपले सर्व तर्क पोकळ ठरतील.प्रवासी मजदूरों को शहर में भी बाहरी कहा जाता है और गाँव से पलायन कर जाने के कारण वो वहाँ के लिए भी परदेसी बन जाते हैं। अपने देश में ही प्रवासी बन गए इन मजदूरों का दर्द ये है कि लॉकडाउन ने शहर को इनके लिए रहने लायक नहीं छोड़ा और महामारी की आशंका इनको गाँव में घुसने नहीं दे रही।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) May 10, 2020
रविवारी देशात कोरोनामुळे मृत्यूची संख्या २ हजार १०९ झाली आहे, तर कोरोनाग्रस्तांची संख्या ६२ हजार ९३९ पर्यंत पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत १२८ लोकांचा मृत्यू झाला तर ३ हजार २७७ रुग्ण आढळले आहेत.कोरोना ने समाज के एक बड़े तबके को बुरी तरह से प्रभावित किया है। खासकर गरीबों-मजदूरों के लिए यह जीने-मरने का सवाल बन चुका है। अपने घर लौटने की जद्दोजहद में लगातार मजदूरों की जान जा रही है, सत्ता व समाज को इसे गंभीरता से लेना चाहिए वरना मानवता की हमारी सारी दलीलें खोखली साबित होगी।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) May 8, 2020
अन्य महत्त्वाच्या बातम्या
"आताचं संकट मोदींना झेपणारं नाही; त्यांनी सर्वपक्षीय सरकार स्थापन करावं"
Lockdown News: आजपासून ५ दिवसांसाठी मोदी सरकारची योजना; घरबसल्या करा स्वस्तात सोनं खरेदी!
पाक दहशतवादी आज काश्मीरमध्ये मोठा हल्ला करण्याची शक्यता; ११ मे हाच दिवस का निवडला?
ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज