Lockdown News: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे सायबर हल्ल्याचा धोका; घरून काम करताना विशेष खबरदारी घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 12:56 AM2020-05-04T00:56:19+5:302020-05-04T07:25:36+5:30
अनेक कंपन्यांनी आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : लॉकडाऊनमुळे देशातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील कर्मचारी आपल्या घरूनच काम करीत आहेत. अशा काळात सायबर गुन्हेगारांनी आपला मोर्चा घरांमधील कॉम्प्युटरकडे वळविला आहे. घरातील कॉम्प्युटर नेटवर्क कमी सुरक्षित असल्याने सायबर हल्ल्याचा धोका वाढला आहे.
तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अनेक कंपन्यांनी आणि विभागांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे. याचा फायदा सायबर गुन्हेगार घेऊ शकतात. राष्ट्रीय तंत्रज्ञान संशोधन संघटनेच्या (एनटीआरओ) एका अधिकाºयाने सांगितले की, गत काही दिवसांत कोरोना अथवा कोविड-१९ नावाच्या वेबसाईटची संख्या वेगाने वाढली आहे. यातील अनेक वेबसाईट वाईट हेतूने बनविण्यात आल्या आहेत. एखादी व्यक्ती या वेबसाईटवर गेली, तर त्याने तात्काळ आपला पासवर्ड आणि अन्य माहिती बदलायला हवी. संवेदनशील पदांवर काम करणाºया सरकारी अधिकाऱ्यांनी घरून काम करताना सावधानी घ्यायला हवी.
गृहमंत्रालयाने दिला इशारा
गृहमंत्रालयाने अलीकडेच एका व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप्लिकेशनबाबत इशारा दिला होता. सरकारच्या अधिकृत कामकाजासाठी झूम हे अॅप असुरक्षित असल्याचे म्हटले होते.