CoronaVirus खबरदार ७ नंतर दिसाल तर; 'या' राज्याने लॉकडाऊन 29 मे पर्यंत वाढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2020 10:45 PM2020-05-05T22:45:41+5:302020-05-05T22:47:00+5:30
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता.
हैदराबाद : कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेऊन केंद्र सरकारने १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता. आता तेलंगानामध्ये २९ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी याची घोषणा केली आहे. याचबरोबर नागरिकांना त्यांनी तंबीही दिली आहे. लोकांना जे काही अत्यावश्यक वस्तू खरेदी करायचे आहे ते ६ पूर्वी घेऊन घरात पोहोचायचे आहे. रात्री ७ वाजल्यापासून राज्यात कर्फ्यू लागू होणार आहे. यानंतर जो कोणी सापडेल त्याची पोलिसांकडून गय केली जाणार नसल्याचे राव यांनी म्हटले आहे.
Lockdown in Telangana extended till May 29 announces Telangana CM pic.twitter.com/HKyqLE3ThY
— ANI (@ANI) May 5, 2020
तेलंगानामध्ये आजपर्यंत १०९६ कोरोनाचे पेशंट सापडले आहेत. तर आज ११ नवे रुग्ण सापडले आहेत. तर ६२८ रुग्णांना बरे झाल्याने घरी पाठविण्यात आले आहे. राज्यात सध्या ४३९ सक्रीय रुग्ण आहेत, असेही राव यांनी सांगितले.
Public should complete purchase of essential items by 6 pm and they should reach their residences. There will be curfew in the state from 7 pm. If anyone is found outside, police will initiate action: Telangana CM K. Chandrashekar Rao pic.twitter.com/OFJxYj74Ks
— ANI (@ANI) May 5, 2020
महत्वाच्या बातम्या...
...तर सिंधुदुर्ग रेड झोनमध्ये जाईल; नितेश राणे संतापले
CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले
CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी
चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त
CoronaVirus धक्कादायक! आंब्याची वाहतूक करणाऱ्या चालकाला कोरोना; सिंधुदुर्गात खळबळ
चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण
दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल