CoronaVirus : 'या' शहरांमध्ये २० एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 03:58 PM2020-04-14T15:58:15+5:302020-04-14T16:00:14+5:30

 CoronaVirus : '२० एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचे मूल्यांकन केले जाईल.'

Lockdown Till 3 May These Areas May Get Relaxations After 20 April If Coronavirus Seem In Control rkp |  CoronaVirus : 'या' शहरांमध्ये २० एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होणार?

 CoronaVirus : 'या' शहरांमध्ये २० एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होणार?

Next

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. दरम्यान, २० एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता सुद्धा नरेंद्र मोदी यांनी वर्तविली आहे.

२० एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचे मूल्यांकन केले जाईल. ज्या क्षेत्रांनी आपले हॉटस्पॉट वाढू दिलेले नाही, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे. तसेच, यासाठी उद्या (बुधवारी) एक सविस्तर नियमावली जारी करण्यात येईल, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

या राज्यातील काही शहरांना मिळू शकते सूट...
ईशान्येकडील राज्यांना, कर्नाटक, छत्तीसगड, बिहार आणि हरयाणामधील काही जिल्ह्यांना लॉकडाऊनमधून सूट देण्याची शक्यता आहे. मात्र, ही सूट कोरोनाचा आकडा वाढला नसेल, तरच मिळणार आहे. म्हणजेच जर २० एप्रिलपर्यंत कोरोनाचा नवा रुग्ण आढळला तर त्याठिकाणी लॉकडाऊन सुरुच राहणार आहे.

या ठिकाणी गेल्या १४ दिवसांत एकही कोरोनाचा नवा रुग्ण आढळला नाही...

राज्‍यजिल्हे
छत्तीसगडराजनांदगांव, दुर्ग आणि विलासपूर
कर्नाटकदेवनगिरी, उडुपी, तुमकुरु आणि कोडगू
महाराष्ट्रगोंदिया
हरियाणापानीपत, रोहतक, सिरसा
बिहारपटना, नालंदा, मुगेर
केरळवायनाड आणि कोट्टायम
मणिपूरवेस्ट इंफाळ
गोवादक्षिण गोवा
जम्मू-कश्मीरराजौरी
मिझोरमआयजोल वेस्ट
पंजाबएसबीएस नगर
राजस्थानप्रतापगड
तेलंगणाभद्राद्री कोट्टागुड़म
उत्तराखंडपौड़ी गडवाल
पुदुचेरीमाहे

Web Title: Lockdown Till 3 May These Areas May Get Relaxations After 20 April If Coronavirus Seem In Control rkp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.