दिल्लीत लॉकडाऊन वाढणार, केजरीवाल यांचं पंतप्रधानांचे स्वागत करणारं ‘ट्विट’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 05:03 AM2020-04-12T05:03:02+5:302020-04-12T05:03:19+5:30

मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत। निर्णयापूर्वीच पंतप्रधानांचे स्वागत करणारे ‘ट्विट’

Lockdown will rise in Delhi, Kejriwal welcomes PM | दिल्लीत लॉकडाऊन वाढणार, केजरीवाल यांचं पंतप्रधानांचे स्वागत करणारं ‘ट्विट’

दिल्लीत लॉकडाऊन वाढणार, केजरीवाल यांचं पंतप्रधानांचे स्वागत करणारं ‘ट्विट’

Next

नितीन नायगावकर ।

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केलेली नसली तरीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांचा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय योग्य असल्याचे टष्ट्वीट करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. त्याचवेळी १४ एप्रिलनंतर दिल्लीत लॉकडाऊन वाढणार असल्याचे स्पष्ट संकेतही दिले.

पंतप्रधानांनी आज (शनिवार) विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीयो कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यात संपूर्ण देशात लॉकडाऊन वाढविण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मांडले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासह इतरांनीही आपापल्या राज्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र, संपूर्ण देशात लॉकडाऊनची गरज असल्याचे मत मांडणाऱ्यांमध्ये केजरीवाल आघाडीवर होते. केवळ राज्यांच्या स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर हा निर्णय व्हावा, असे त्यांनी या चर्चेत सूचवले.
यात काही प्रमाणात सुट देण्याचा विचार झाला तरीही रेल्वे, विमानसेवा तसेच रस्त्यांवरील वाहतुक कोणत्याही परिस्थितीत सुरू करू नये, असा आग्रह त्यांनी पंतप्रधानांकडे धरला. यातून ३० एप्रिलपर्यंत टाळेबंदी वाढावी, यासाठी दिल्ली सरकार आग्रही असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्तरावर घोषणा केली नाही, तरीही केजरीवाल मात्र दिल्लीतील लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय नक्कीच जाहीर करतील.
दिल्लीमध्ये अद्याप कोरोनाचे सामुदायिक संक्रमण झालेले नाही, असा दावा केजरीवाल सातत्याने करीत असले तरीही रुग्णसंख्या एक हजाराच्या आसपास येऊन पोहोचली आहे. अश्या परिस्थितीत लॉकडाऊन संपुष्टात आले तर सगळे प्रयत्न अपयशी ठरतील, असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. तसेच दिल्लीमध्ये कोरोनाचे ३० हॉटस्पॉट सध्या सील करण्यात आले आहे. येथील निर्बंध किमान चौदा दिवसांसाठी म्हणजे एप्रिलच्या अखेरपर्यंत असतील. त्यामुळे तशीही लॉकडाऊन संपण्याची चिन्हे नाहीत. काही दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन संपवावे, असा विचार दिल्ली सरकार करीत होते, असेही सूत्रांकडून कळते.
पंतप्रधानांचा निर्णय योग्य
व्हिडीयो कॉन्फरन्सनंतर काही तासांनी केजरीवाल यांनी एक टष्ट्वीट केले आणि टष्ट्वीटरवरील ट्रेंड बदलला. पंतप्रधानांनी लॉकडाऊन वाढविण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतला आहे.
भारताने लवकर लॉकडाऊन घोषित केल्यामुळे आज आपली परिस्थिती इतर विकसित देशांच्या तुलनेत बरी आहे. मात्र आता लॉकडाऊन संपुष्टात आले तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल, असे टष्ट्वीट केजरीवाल यांनी केले. त्यावर पंतप्रधानांनी अद्याप निर्णय जाहीर केलेला नसताना त्यांचे स्वागत केल्यामुळे केजरीवाल ट्रोल झाले.


पहिल्या कोरोना हॉटस्पॉटमध्ये १० दिवसांत एकही रुग्ण नाही
नितीन अग्रवाल ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिल्लीतील पहिला कोरोना हॉटस्पॉट असलेला दिलशाद गार्डन या लढाईतील आदर्श उदाहरण बनले आहे. देशाच्या राजधानीमध्ये कोरोनाबाधितांचे सर्वात जास्त म्हणजेच ८ पेक्षा जास्त प्रकरणे समोर आल्यानंतर दिल्ली सरकारने येथे जी पावले उचलली आहेत, त्याचा परिणाम म्हणून येथे मागील १० दिवसांत एकही कोरोना संक्रमित रुग्ण आढळला नाही. दिल्ली सरकारच्या एका आरोग्य अधिकाºयाने ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, या ठिकाणी ८ रुग्ण समोर आल्यावर येथे केजरीवाल सरकारने आॅपरेशन शिल्ड सुरू केले.

याअंतर्गत उत्तर प्रदेशला लागून असलेल्या संपूर्ण भागाची नाकाबंदी करण्यात आली. सर्वात प्रथम दुबईहून परतलेला एक जण व त्याची आई कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्यांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागली. अशा ८१ जणांची ओळख पटवण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांनी या भागात घरोघरी जाऊन १५,००० पेक्षा जास्त लोकांची आरोग्य तपासणी व स्क्रीनिंग केली. त्यानंतरही हजारो लोकांना त्यांच्या घरातच क्वारंटाईन केले.

दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन यांनी सांगितले आहे की, दिलशाद गार्डन कोरोनामुक्त झाला आहे. मागील अनेक दिवसांत या भागातून नवीन रुग्ण आढळलेला नाही. तथापि, सरकारने राजधानीतील २० भागांना कोरोना हॉटस्पॉटच्या रूपात चिन्हीत केले आहे.
या भागात राहणारे नरेश कुमार यांनी सांगितले की, दिलशाद गार्डनमध्ये एकानंतर एक असे ८ रुग्ण आढळल्याने दहशतीचे वातावरण होते. प्रत्येक जण घाबरलेला होता. प्रशासनाने येथे ज्या धडाडीने काम केले ते प्रशंसनीय आहे. लोकांकडून अर्ज भरून घेऊन आरोग्य सर्वेक्षणही केले होते. गरजूंना रुग्णालयांत भरतीही केले होते. शालेय शिक्षक शंकर सिंह यांनी सांगितले की, आमच्या भागात आजही पूर्ण काळजी घेतली जात आहे.

...तोपर्यंत ही लढाई सुरूच
दिलशाद गार्डनचे लोक सध्या सुटकेचा नि:श्वास सोडत असले तरी अधिकाºयांनी मात्र येथील धोका पूर्णपणे संपलेला आहे, असे मानलेले नाही. कोरोनाचा उद्रेक संपूर्णपणे संपत नाही, तोपर्यंत ही लढाई चालूच राहील, असे ते मानत आहेत.

Web Title: Lockdown will rise in Delhi, Kejriwal welcomes PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.