Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 10:47 AM2020-08-06T10:47:27+5:302020-08-06T10:49:32+5:30
कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती.
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास आज दुपारी 12 वाजता एमपीसीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करणार आहेत. आरबीआयने एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ही एमपीसीची 24 वी बैठक आहे. कोरोना संकटाच्या काळात ही बैठक झाल्याने रेपो रेटमध्ये कपातीसह मोरेटोरिअम दिलासा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोरोना, लॉकाडाऊनमुळे मंद झालेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी आरबीआयने याआधीही काहीवेळा रेपो दरात कपात केली आहे. मात्र, यावेळी रेपो दरात कपात करण्यास बगल दिली जाऊ शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कर्जाची पुनर्बांधणीसारख्या उपायांना महत्व दिले जाण्याची शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांनुसार पुन्हा रेपो दरात कपात केली जाऊ शकते.
लॉकडाऊन काळात कर्जासाठी दिलेला ईएमआय दिलासा सुरु ठेवण्याबाबत किंवा त्यावर अन्य काही दिलासा देण्याची घोषणा केली जाऊ शकते. या EMI दिलाशाचा कालावधी 31 ऑगस्टला संपणार आहे. बँका या सवलतीचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता वर्तवित असून यास विरोध करत आहेत. एचडीएफसीने पहिल्यांदा मुदतवाढ करण्य़ास विरोध केला आहे.
Watch out for Bi-monthly Monetary Policy address by RBI Governor @DasShaktikanta at 12:00 hrs on August 06, 2020 #rbitoday#rbigovernor
— ReserveBankOfIndia (@RBI) August 6, 2020
YouTube: https://t.co/ioXHI7kdUB
Twitter: @RBI
@RBIsayshttps://t.co/X2ON7F8SCw
कोरोना काळात दोन बैठका
कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती. या दोन्ही बैठकांमध्ये मिळून आरबीआयच्या व्याजदरात 1.15 टक्के कपात केली होती. अर्थव्य़वस्था सुधारण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी 2019 नंतर आतापर्यंत एकूण 2.50 टक्क्यांनी व्याजदरात कपात केली आहे. कोरोना काळात या व्याजदर कपातीचा फायदा बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचविला आहे.
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका
राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार
Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला
राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार
लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली
शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार