लॉकेटने वाचवले 'तिचे' प्राण

By Admin | Updated: September 21, 2016 16:42 IST2016-09-21T16:40:41+5:302016-09-21T16:42:32+5:30

प्रेयसीने लग्नाला दिलेला नकार पचवता न आल्याने चिडलेल्या प्रियकराने जवळून प्रेयसीवर गोळी झाडली. पण सुदैवाने...

Locket saved her 'Prana' | लॉकेटने वाचवले 'तिचे' प्राण

लॉकेटने वाचवले 'तिचे' प्राण

ऑनलाइन लोकमत 

गुरगाव, दि. २१ - प्रेयसीने लग्नाला दिलेला नकार पचवता न आल्याने चिडलेल्या प्रियकराने जवळून प्रेयसीवर गोळी झाडली. पण सुदैवाने गळयातील लॉकेटमुळे प्रेयसीचे प्राण वाचले. गुरगावच्या सेक्टर ५५ मधील सदभावना अपार्टमेंटमध्ये सोमवारी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. 
 
आरोपी अशोक कुमारचे (२७) मागच्या सात महिन्यांपासून ताबसी नंदी (३२) बरोबर प्रेम प्रकरण सुरु होते. अशोक एका इलेट्रॉनिक्स शो रुममध्ये डेप्युटी मॅनेजर आहे. सूरत नगरमध्ये रहाणारा अशोक सोमवारी रात्री ताबसीला भेटण्यासाठी सदभावना अपार्टमेंटमधील तिच्या घरी गेला होता. 
 
त्याने ताबसीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. यापूर्वी अनेकदा त्याने दिलेला लग्नाचा प्रस्तान ताबसीने धुडकावला होता. यावेळीही ताबसीने लग्नाच्या प्रस्तावाला नकार देताच दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. चिडलेल्या अशोकने त्याच्या जवळचे पिस्तुल काढले आणि ताबसीवर गोळी झाडली.  
 
केवळ नशीब बलवत्तर असल्याने अशोकने झाडलेली गोळी ताबसीच्या गळयातील लॉकेटला जाऊन लागल्याने तिचे प्राण बचावले. गोळीच्या आवाजाने इमारतीतील रहिवाशी बाहेर आले आणि त्यांनी अशोकला पकडून पोलिसांच्या हवाली दिले. 
 

Web Title: Locket saved her 'Prana'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.