बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:44 AM2020-07-02T07:44:55+5:302020-07-02T07:45:13+5:30
विशेष म्हणजे भारताला कोरोनाच्या पाठोपाठ दुसरं एक संकट डोकं वर काढत आहे.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कोरोनानं जगभरात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालल्यानं अनेक देश चिंतीत आहेत. अनेक देशांनी कोरोनावर लस तयार केल्याचा दावा केला आहे. पण कोरोनावर मात करू शकेल, अशी कोणतीही लस अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाही. विशेष म्हणजे भारताला कोरोनाच्या पाठोपाठ दुसरं एक संकट डोकं वर काढत आहे.
देशाच्या पश्चिम राज्यांत टोळांनी हैदोस घातला असून, या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील कोट्यवधी जिल्ह्यांत या टोळांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे पंतनगर कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तराखंडमधील मैदानी आणि डोंगराळ जिल्ह्यांमधील ऊस, मका आणि भाजीपाला पिकांवर टोळ हल्ला करणार असल्याची शक्यता विद्यापीठाने व्यक्त केली आहे.
शास्त्रज्ञांनी या टोळीधाडीपासून बचावासाठी शेतकऱ्यांना काही उपायही सुचवले आहेत. टोळधाड दिसताच शेतात मोठ्या प्रमाणात धूर करावा किंवा मोठमोठा आवाज होईल, असं काही तरी करावं. जेणेकरून ते टोळ शेतात शिरणार नाहीत. पौरी जिल्ह्यातील काही शेतकर्यांकडून टोळधाडीची माहिती मिळाली आहे, ज्यांची संख्या फारच कमी आहे. वादळाबरोबर या टोळांनी पौडी जिल्ह्यातील डोंगराळ भागात प्रवेश केला आहे. शास्त्रज्ञांनी सर्व जिल्ह्यांतील शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचार्यांना टोळधाडीपासून सावध राहण्यास सांगितले आहे.
फोन नंबर केला जारी
उत्तराखंडमधील टोळधाडीवर नजर ठेवण्यासाठी पंतनगर विद्यापीठातर्फे एक समिती तयार करण्यात आली आहे. त्या समितीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. तिवारी म्हणाले की, टोळ हे शनिवारी दिल्ली-हरियाणा सीमेवर सक्रिय होते, परंतु ते पूर्णपणे दिल्लीत दाखल झालेले नाहीत. टोळ एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतांची नासधूस करतात आणि वाटेत येणा-या सर्व वनस्पतींनाही गिळंकृत करतात. टोळ दिसल्यास शेतकर्यांनी अतिरिक्त आवाज (ड्रम किंवा वादन करून) करावा आणि शेतात धूर निर्माण करावा
टोळधाड दिसली तर येथे कॉल करा
डॉ. तिवारी म्हणाले की, शेतकर्यांच्या कोणत्याही शेतात टोळांचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांनी ताबडतोब कृषी संचालनालय, उत्तराखंड यांना या जिल्ह्यातील मुख्य कृषी अधिकारी यांना 18001800011 या फोन नंबरवर कळवावे.