भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2023 12:24 PM2023-09-26T12:24:13+5:302023-09-26T12:24:47+5:30

५६ विमाने २१,९३५ कोटींत ‘एअरबस’कडून मिळणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

Logistics, capacity of Indian Army will increase; First 'C-295' in Air Force | भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

googlenewsNext

गाझियाबाद (उ. प्र.) : सैन्याची रसद व इतर क्षमता वाढविणारे पहिले ‘सी-२९५’ मध्यम रणनीतिक वाहतूक विमान सोमवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत येथील हिंडन हवाई दल केंद्रावर आयोजित कार्यक्रमात हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. ‘एअरबस डिफेन्स ॲण्ड स्पेस’ कंपनीने १३ सप्टेंबर रोजी सी-२९५ वाहतूक विमान हवाई दलाच्या सर्वात जुन्या वडोदरा स्थित ११ व्या तुकडीत समाविष्ट केले. 

भारताची ‘ड्रोन शक्ती’
n संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथील हिंडन एअरबसवर आयोजित केलेल्या ‘मेगा ड्रोन शो’चे उद्घाटन केले. सिंह यांनी यावेळी ड्रोनची काही हवाई प्रात्यक्षिकेही पाहिली. 
n नंतर त्यांनी प्रदर्शन करत परिसर आणि काही स्टॉल्सनाही भेट दिली. सुमारे ७५ ड्रोन  प्रदर्शनात आहेत, तर ५० हून अधिक ड्रोन हवेत घिरट्या घालत होते.

संरक्षण मंत्री सिंह यांनी हवाई दलात सी-२९५ सामील झाल्याप्रीत्यर्थ आयोजित सर्व धर्म पूजेमध्ये भाग घेतला. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी या कार्यक्रमाला हवाई दल व तळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. 

₹२१,९३५कोटी 
करार ‘एअरबस’शी  
दोन वर्षांपूर्वी केला

५६
वाहतूक विमाने खरेदी 

७१
सैनिक वा ५० पॅराशूटधारी सैनिकांच्या (पॅराट्रूपर्स) वाहतुकीसाठी वापरतात.

जिथे सध्याची अवजड विमाने पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी लष्करी उपकरणे, पुरवठा करण्यासाठी वापर.

सैनिकांना उतरवण्यासाठी आणि पॅराशूट साहाय्याने सामान टाकण्यासाठी अतिशय उपयुक्त.

अपघातग्रस्त आणि 
आजारी लोकांना बाहेर काढण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. 

Web Title: Logistics, capacity of Indian Army will increase; First 'C-295' in Air Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.