लग्नपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मोदींनी रिट्विट करत केलं फॉलो

By admin | Published: April 4, 2017 01:02 PM2017-04-04T13:02:46+5:302017-04-04T13:13:23+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाश जैन या व्यवसायिकाचं कौतुक करत त्याला ट्विटरवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे

The logo of Swachh Bharat campaign on marriage certificate, Modi retweeted and followed | लग्नपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मोदींनी रिट्विट करत केलं फॉलो

लग्नपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो, मोदींनी रिट्विट करत केलं फॉलो

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - बंगळुरुमधील व्यवसायिक आकाश जैन याने ट्विटरवर आपल्या बहिणीची लग्नपत्रिका शेअर केली होती. इतरांची असते त्यासारखीच हीदेखील एक लग्नपत्रिका होती. आकाश जैनचं हे ट्विट पंतप्रधान मोदींनीही रिट्विट केलं असं सांगितलं तर तुमच्या भुवया उंचावतील. पण त्यामागचं कारणही तसंच आहे. आकाश जैनच्या बहिणीच्या लग्नपत्रिकेवर एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे स्वच्छ भारत अभियानाचा लोगो. लग्नपत्रिकेवर स्वच्छ भारत अभियानाचा लोगो छापण्यात आला होता. 
 
स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार करण्याच्या हेतूने आकाश जैनच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचं थेट पंतप्रधान मोदींनी कौतुक केलं. पंतप्रधान मोदींना त्यांची ही कल्पना इतकी आवडली की त्यांनी आकाशचं ट्विट रिट्विट केलं. इतकंच नाही तर त्यांनी आकाश जैनला ट्विटरवर फॉलो करण्यासही सुरुवात केली. 
 
आकाश जैन यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि त्यातही थेट पंतप्रधानांकडून अशाप्रकारे कौतुक होणार असेल तर सामान्यही असे निर्णय घेताना मागे हटणार नाहीत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यानंतर सर्वात आधी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली होती. 2014 मध्ये जेव्हा पंतप्रधान मोदींनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली तेव्हा अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी हे अभियान म्हणजे फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं असताना दुसरीकडे समर्थकांनी मात्र त्यांचं कौतुक करत त्यांना साथ दिली. पंतप्रधान देशाला स्वच्छ करण्यासाठी पाऊल उचलत असल्याबद्दलही अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला होता. आपल्याला पाठिंबा देणारे निराश होऊ नयेत याची पुरेपूर काळजी पंतप्रधान मोदी घेताना दिसत आहेत.
 

Web Title: The logo of Swachh Bharat campaign on marriage certificate, Modi retweeted and followed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.