तटरक्षक दलाचे लोशाली बडतर्फ

By admin | Published: December 15, 2015 04:46 AM2015-12-15T04:46:47+5:302015-12-15T04:46:47+5:30

सरकारच्या भूमिकेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मासेमारीच्या मिषाने गुजरात

Lohardi Badshar of the Coast Guard | तटरक्षक दलाचे लोशाली बडतर्फ

तटरक्षक दलाचे लोशाली बडतर्फ

Next

 पाकिस्तानी जहाजावरील आत्मघात : वादग्रस्त वक्तव्य आले अंगलट

नवी दिल्ली : सरकारच्या भूमिकेविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारे तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी.के. लोशाली यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मासेमारीच्या मिषाने गुजरात किनारपट्टीलगत भारतीय हद्दीत स्फोटकांच्या साठ्यासह शिरलेल्या संशयास्पद पाकिस्तानी नौकेला आत्मघाती स्फोटांनंतर मिळालेल्या जलसमाधी आणि बुडाल्याप्रकरणी शासकीय भूमिकेच्या विरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्य लोशाली यांना भोवले. चौकशी मंडळाने लोशाली यांना त्यांच्यावरील सर्व आरोपांबद्दल शनिवारी दोषी ठरविल्यावर बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला.
ही मूळ घटना यंदाच्या नववर्षदिनाच्या पहाटेची. एका पाकिस्तानी नौकेला तटरक्षकांनी थरारक पाठलागानंतर घेरल्यानंतर नौकेवरील (मच्छीमार न वाटणाऱ्या) संशयितांनी आत्मघाती स्फोटांतून आग लावली असा सरकारचा दावा होता. पण लोशाली यांनी १५ फेब्रुवारीला तटरक्षक अधिकाऱ्यांशी बोलताना ३१ डिसेंबरच्या रात्री मी गांधीनगरला होतो आणि स्फोट घडवून जहाज उडविण्याचे आदेश मीच दिले होते कारण आम्हाला त्यांना बिर्याणी खाऊ घालायची नव्हती,असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्याने सरकार आणि तटरक्षक दल अडचणीत आले होते.
वरिष्ठ महानिरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या एका पथकाने तीन महिने याप्रकरणाचा तपास केला. बोर्ड आॅफ इन्क्वायरीने तीन महिन्यांच्या तपासासोबत त्यांचे कोर्ट मार्शलही केले. या घटनेनंतर लोशाली यांना वायव्य क्षेत्र चीफ आॅफ स्टाफ पदावरून हटवून गांधीनगरातील क्षेत्रीय मुख्यालयात पाठविण्यात आले होते.

काय घडले होते..
स्फोटानंतर आगीत जळालेल्या या जहाजातील चारही जण मृत्युमुखी पडले. या जहाजावर स्फोटके होती व या संशयितांना अडविण्यात आल्यानंतर त्यांनी आत्मघात केला,असा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी परिस्थितीजन्य पुराव्यांवरून या पाकिस्तानी जहाजाचा संशयित दहशतवाद्यांशी संबंधांचे संकेत मिळाले असल्याचे म्हटले होते. जहाजावरील लोक दहशतवादी नव्हे तर केवळ तस्कर असल्याचा दावा फेटाळताना आणि ते पाकिस्तानी सागरी अधिकारी, लष्कर तसेच अन्य आंतरराष्ट्रीय लोकांच्या संपर्कात होते असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
(वृत्तसंस्था)

Web Title: Lohardi Badshar of the Coast Guard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.