Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 11:42 AM2024-05-03T11:42:03+5:302024-05-03T11:49:00+5:30
Lok Sabh Elections 2024 Lalu Prasad Yadav And Narendra Modi : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव निवडणुकीत सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. दोन टप्पे पूर्ण झाले असून तिसऱ्या टप्प्याची तयारी सुरू आहे. एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. याच दरम्यान, एकीकडे नेते निवडणुकीच्या सभा घेत आहेत तर दुसरीकडे एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. या निवडणुकीत आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादवही सक्रिय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
मोदींचे आवडते शब्द कोणते आहेत हे लालू प्रसाद यादव यांनी खोचक टोला लगावत सांगितले आहेत. "देशवासियांना नमस्कार! आज हिंदी भाषेत सुमारे 1.5 लाख शब्द बोलले जातात आणि अभ्यासाच्या सर्व शाखांमध्ये तांत्रिक शब्दांसह सुमारे 6.5 लाख शब्द आहेत, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्वात आवडते शब्द आहेत - पाकिस्तान, स्मशानभूमी, कब्रिस्तान, हिंदू-मुस्लिम, मंदिर-मशीद, मासे-मुघल, मंगळसूत्र, गाई-म्हशी."
प्रणाम देशवासियों!
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 3, 2024
हिंदी भाषा में आज लगभग 1.5 लाख शब्द बताये जाते हैं तथा अध्ययन की सभी शाखाओं में तकनीकी शब्दों को मिलाकर लगभग 6.5 लाख शब्द हैं।
लेकिन देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के पसंदीदा, सबसे (𝐟𝐚𝐯𝐨𝐮𝐫𝐢𝐭𝐞) शब्द हैं:-
पाकिस्तान
श्मशान
क़ब्रिस्तान…
"वरील यादी पहिल्या दोन टप्प्यांच्या निवडणुकांपर्यंतची आहे. सातव्या टप्प्यापर्यंत या यादीत काही दोन-चार नावं आणखी जोडली जाऊ शकतात. नोकरी-रोजगार, गरीबी-शेतकरी, महागाई-बेरोजगारी, विकास- गुंतवणूक, विद्यार्थी, विज्ञान, युवक इत्यादी मुद्दे ते विसरले आहेत" असं म्हणत लालू प्रसाद यादव यांनी पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. तेजस्वी यादव आपल्या निवडणूक रॅलीत पंतप्रधान मोदींचं जुनं विधान माईकवर सर्वांना ऐकवलं आहेत. आता ते ना नोकऱ्यांबद्दल बोलतात, ना महागाईबद्दल, ना बेरोजगारीबद्दल, ना गरिबीबद्दल. तसेच विकासावरही बोलू शकत नाहीत असं म्हणत निशाणा साधला आहे.