लोकसभा उद्यापर्यंत स्थगित

By admin | Published: July 7, 2014 04:07 PM2014-07-07T16:07:33+5:302014-07-07T16:07:33+5:30

महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरत गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावे लागले.

Lok Sabha adjourned till tomorrow | लोकसभा उद्यापर्यंत स्थगित

लोकसभा उद्यापर्यंत स्थगित

Next

 

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ७ -  महागाई आणि रेल्वे भाडेवाढीविरोधात विरोधकांनी लोकसभेत मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरत गोंधळ घातल्याने लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित करावे लागले. महागाईच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत होते. 
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी महागाईच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकजूट दाखवत मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. लोकसभेचे कामकाज सुरु होताच  काँग्रेस, आम आदमी पार्टी,  जनता दल संयुक्त, डावे पक्ष आणि समाजवादी पक्षाच्या खासदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी सुरु केली. यात अण्णा द्रमुक, बीजू जनता दलाच्या खासदारांनी सहभाग घेतला नव्हता. महागाईच्या मुद्द्यावर लोकसभेत चर्चा करावी अशी मागणी विरोधक करत होते.  
विरोधी पक्षाच्या खासदारांच्या गोंधळात प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवात झाली. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. अच्छे दिन आये हे, महंगाई लाये है अशा घोषणा विरोधक देत होते. घोषणाबाजी करण्यासाठी समोर आलेल्या खासदारांमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश होता. दुपारी दोन वाजता पुन्हा कामकाजाला सुरुवात झाली. मात्र विरोधकांनी गोंधळ सुरु ठेवल्याने लोकसभा दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रथमच लोकसभा विरोधीपक्ष नेतेपदाच्या भूमिकेविषयी मौन सोडले. लोकसभेतील सर्वात मोठा विरोधी पक्ष आमचा असून या पदावर आमचाच हक्क आहे. हे पद न मिळाल्यास 'बघू' असे सूचक विधान त्यांनी केले आहे. 

Web Title: Lok Sabha adjourned till tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.