गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 04:06 PM2019-04-20T16:06:09+5:302019-04-20T16:07:36+5:30

दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे.

Lok Sabha Election 2019 Akhilesh Yadav in Gorakhpur | गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

Next

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील सर्वात प्रतिष्ठेचा असलेला गोरखपूर मतदार संघात दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे येथील लोकसभा लढत आणखीच रंगतदार होत आहे. २०१८ मध्ये झालेल्या पोट निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमध्ये भाजपला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आपला गड परत मिळवण्यासाठी योगी प्रयत्न करत आहेत. मात्र एक समीकरण स्थिर केल्यानंतर आता दुसरं फिसकटत असल्यामुळे योगी हैराण झाले आहे. सपा प्रमुख अखिलेश यादव सत्ते पे सत्ता चाल करत योगींच्या योजनेला सुरूंग लावला आहे.

याआधी योगी यांनी गोरखपूर जिंकण्यासाठी पोटनिवडणुकीत विजयी झालेले प्रविण निषाद आणि त्यांचे वडील संजय निषाद यांनाच भाजपमध्ये सामील करून घेतले होते. सपा-बसपा युतीला हा मोठा धक्का मानला जात होता. त्यापाठोपाठर निषाद समाजाच्या दुसऱ्या दिग्गज नेत्या राजमती निषाद आणि त्यांचे चिरंजीव अमरेंद्र निषाद यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र या मायलेकांनी दीड महिन्यांच्या आतच सपामध्ये घरवापसी केली आहे. यामुळे योगींनी जुळवलेले जातीची समीकरणे पुन्हा एकदा बिघडले आहे.



 

दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे.

 

Web Title: Lok Sabha Election 2019 Akhilesh Yadav in Gorakhpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.