मोदींची मुलाखत घेणाऱ्या अक्षयने मतदान केल....?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2019 03:11 PM2019-04-30T15:11:13+5:302019-04-30T15:18:25+5:30
सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी अक्षय कुमार कुठेही मतदान करताना दिसला नाहीत. अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही असा दावा सोशल मिडियावर होतांना दिसत आहे.
मुंबई - चौथ्या टप्यात झालेल्या मतदानवेळी मुंबई मध्ये अनेक सेलीब्रेटिनी मतदानाचा हक्क बजावला. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेणाऱ्या सिनेअभिनेता अक्षय कुमारने मतदान केले का ? अशा पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने अराजकीय मुलाखत घेतली होती. अक्षयने घेतलेली मुलाखत अराजकीय असली तरीही त्यावर राजकीय प्रतिक्रिया पहायला मिळाल्या. सोशल मिडियावर अक्षयने घेतेलेल्या मुलाखतीच्या पोस्ट फिरत असल्याचे पहायला मिळाले होते.
सोमवारी झालेल्या चौथ्या टप्प्यातील मतदानावेळी अक्षय कुमार कुठेही मतदान करताना दिसला नाहीत. अक्षय कुमार कॅनडाचा नागरिक असल्यामुळे त्याला मतदान करता येणार नाही असा दावा सोशल मिडियावर होतांना दिसत आहे. मोदींची मुलाखत घेणारे अक्षय मतदान केले का ? असे प्रश्न सोशल मिडीयावर विचारले जात आहे.
I have given my #Vote like a true Indian. But some fake #Deshbhakt like Akshay kumar don’t have this right! They can vote to choose only Canadian PM. pic.twitter.com/dakTK3qsYX
— KRK (@kamaalrkhan) April 29, 2019
पंतप्रधान मोदींच्या मुलाखतीनंतर अक्षय प्रचंड चर्चेत आला होता. या मुलाखतीत देश हिताच्या प्रश्ना वर सुद्धा चर्चा झाली असल्याची पहायला मिळाले होते. लोकशाहीचा उत्साहा समजल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीत अक्षय कुमार यांनी मतदान केले की नाही याबाबत उलटसुलट चर्चा होतांना दिसत आहे. अक्षय कुमारला ट्विट करून अनेक जन मतदान केला का, असा प्रश्न विचारताना पहायला मिळत आहे.
Anyone know which booth Akshay Kumar is voting in? https://t.co/Wb4FiAEImk
— Sandeep (@SandeepUnnithan) April 29, 2019
अक्षयच्या मतदानाबाबतचा खुलासा व्हावा यासाठी माध्यमांनी अक्षय कुमार यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध झाली नसल्याचा बातमीत म्हंटले आहे.