भाजपाच्या राजकारणात मी 'आयटम गर्ल'; आझम खान बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 06:34 PM2018-10-24T18:34:13+5:302018-10-24T18:40:39+5:30
उलटसुलट विधाने करुन वारंवार चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आझम खान पुन्हा बरळल्याचे पाहायला मिळाले.
नवी दिल्ली - उलटसुलट विधाने करुन वारंवार चर्चेत असणारे समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय महासचिव आझम खान पुन्हा बरळल्याचे पाहायला मिळाले. भाजपाच्या राजकारणात मी 'आयटम गर्ल' आहे, असे बेताल विधान आझम खान यांनी केलेआहे. ''भाजपाच्या राजकारणात मी आयटम गर्ल आहे. गत वर्षी उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूक माझ्या नावावर लढवण्यात आली. आता भाजपाकडून आगामी लोकसभा निवडणूकही माझ्या नावावर लढवण्यात येईल,असे विधान आझम खान यांनी केले आहे. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले आहे.
भाजपा सर्व निवडणुका माझ्या नावावरच लढवत आली आहे. आता मला देखील माहिती नाही की माझ्यावर एकूण किती खटले दाखल करण्यात आले आहेत, असे सांगत आझम खान यांनी स्वतःचा उल्लेख आयटम गर्ल असा केला व दुसरीकडे भाजपावर टीकास्त्र सोडले. याबाबत आझम खान यांनी पुढे असेही सांगितले की, माझ्याकडे कोणतीही संपत्ती नाही. माझं केवळ एकच बँक खाते आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही अन्य बँकेत खाते आढळून आल्यास मला कुतुब मीनारवर फासावर लटकवण्यात यावे.