अरुणाचल प्रदेशात मतदानापूर्वीच भाजपचा तीन जागांवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 12:12 PM2019-03-29T12:12:45+5:302019-03-29T12:13:18+5:30
अरुणाचल प्रदेशात ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
नवी दिल्ली - अरुणाचल प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मतदानापूर्वीच तीन जागा मिळवत आपल्या लोकसभा निवडणुकीच्या अभियानाला सुरुवात केली आहे. गुरुवारी भाजपने येथे झालेल्या तीन विधानसभा निवडणुकीत बिनविरोध विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाने दिरांग, यचूली आणि आलो ईस्ट मतदार संघाचे निकाल घोषीत केले आहे.
अप्पर मुख्य निवडणूक आयुक्त केंगी दरांग यांनी सांगितले की, आलो ईस्ट विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे केंटी जिनी यांनी बिनविरोध निवडणूक लढवली. त्यांच्याविरुद्ध काँग्रेसचे मिनकिर लोलेन यांनी अर्ज दाखल केला होता. परंतु, मंगळवारी तपाणीनंतर त्यांचा नामांकन अर्ज रद्द करण्यात आला आहे. तसेच दिरांग मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार शेरिंग ग्युरमे आणि अपक्ष उमेदवार गोम्बू शेरिंग यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. त्यानंतर भाजपचे फुरपा शेरिंग यांना विजयी घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त यचुली विधानसभा मतदार संघातून ताबा तेदीर यांनी बिनविरोध विजय मिळवला आहे.
Congratulations to entire @BJP4India karyakartas! BJP MLA candidate from 4-Dirang Assembly Constituency in Arunachal Pradesh Shri Phurpa Tsering is elected unopposed. With this 3 BJP MLA candidates are elected unopposed! pic.twitter.com/EPnaXuCrMr
— Chowkidar Kiren Rijiju (@KirenRijiju) March 28, 2019
आता राज्यातील ५७ जागांसाठी १९१ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. यामध्ये भाजपचे ५७, काँग्रेसचे ४७, नॅशनल पिपल्स पक्षाचे ३०, जदयूचे १७, जेडीएसचे १३ आणि एआय इंडियाचे १७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या ६० आणि लोकसभेच्या दोन जागा आहेत.