मतदानानंतर बोट कापणाऱ्या युवकाचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 11:11 AM2019-04-20T11:11:12+5:302019-04-20T11:13:55+5:30
बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती.
Next
ब लंदशहर – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात मतदान करताना चुकीचं बटन दाबल्यामुळे एक युवकाने आपले बोट कापल्याचे वृत्त आले होते. आता त्या युवकाने मतदानानंतर बोट का कापले याचं खरं कारण समोर आले आहे. खुद्द युवकानेच बोट कापून घेण्यामागचा धक्कादायक खुलासा केला आहे. अब्दुल्लाहपूर हुलासन गावातील पवन कुमारने सांगितले की, मी हत्तीला अर्थात बसपला मतदान करण्यासाठी गेलो होते. परंतु, चुकून कमळाचे बटन दाबले गेले. त्यानंतर मी घरी येऊन बोट कापून घेतले. ज्या बोटावर मतदान केल्यानंतर शाई लावण्यात आली होती, तेच बोट पवनकुमारने कापून घेतले होते. देशात मतदान केल्यानंतर बोटावर शाई लावण्यात येते. बुलंदशहरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान गुरुवारी झाले. पवन कुमारने देखील याचवेळी मतदान केले. पवन कुमारने सांगितले की, मला माझं मन खात होतं. आपल मत व्यर्थ गेल्याची भावना माझ्या मनात होती. त्यामुळे पु्न्हा मतदान करण्याची माझी ईच्छा होती. त्यामुळेच मी मतदानाची शाई लागलेले बोट कापले. तसेच मी केवळ मायावती यांनाच मत देणार होतो. त्या आमच्या जातीच्या असल्याचे पवन कुमार पुढे म्हणाले. याआधी चुकीचे बटन दाबल्या गेल्यामुळे पवनने बोट कापल्याचे वृत्त होते. वास्तविक पाहता पवनला दुसऱ्यांदा मतदान करायचे होते, त्यामुळे त्याने बोट कापून घेतले होते. पवन कुमार यांचे बोट नखापासून वेगळे झाल्याचे सांगण्यात आले. पवनला त्याच्या भावाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयात गेल्यामुळे मी पुन्हा मतदान करण्यासाठी जाऊ शकलो नाही, असंही पवन कुमारने सांगितले. सध्या पवन कुमारची स्थिती ठिक आहे. केवळ भावनेच्या भरात त्याने बोट कापून घेतल्याचे पवन कुमारच्या काकांनी सांगितले.