जेव्हा जिल्हाधिकारीच मत पेट्या उतरवतात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 01:15 PM2019-04-22T13:15:54+5:302019-04-22T13:16:02+5:30

तिसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकीत केरळमध्ये मतदान होणार आहे. मात्र केरळमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केरळच्या थ्रिसूर येथील जिल्हाधिकारी टी.वी.अनुपमा या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या सामानाच्या अवजड पेट्या वाहनातून उतरवताना दिसत आहेत.

lok sabha election 2019 collector Pick up ballot boxes | जेव्हा जिल्हाधिकारीच मत पेट्या उतरवतात

जेव्हा जिल्हाधिकारीच मत पेट्या उतरवतात

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीचा तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि अधिकारी वर्ग तयारीला लागले आहे. मतदान केंद्रांवर मतपेट्या पोहचविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. अशातच केरळमधील प्रशासनाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत जिल्हाधिकारी गाडीतून मत पेट्या उतरवत असल्याचे दिसत आहे.

तिसऱ्या टप्यात होणाऱ्या निवडणुकीत केरळमध्ये मतदान होणार आहे. मात्र केरळमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. केरळच्या थ्रिसूर येथील जिल्हाधिकारी टी.वी.अनुपमा या सहकाऱ्यांच्या मदतीने मतदान प्रक्रियेसाठी आलेल्या सामानाच्या अवजड पेट्या वाहनातून उतरवताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी अनुपमा निवडणुकीचे ओझं वाहत आहेत अशा पोस्ट सोशल मिडीयावर शेयर केल्या जात आहे.  

सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेक ठिकाणी अधिकारी आपला पदाचा मान मिरवताना पाहायला मिळत असतात. मात्र केरळ मधील जिल्हाधिकारी टी.वी.अनुपमा यांनी कनिष्ठ आणि वरिष्ठ यांच्या पलीकडे जाऊन कर्तव्यनिष्ठ अधिकारीही जनतेच्या सेवत असल्याचे सिद्ध केले असल्याची चर्चा सुरू आहे.

Web Title: lok sabha election 2019 collector Pick up ballot boxes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.