हिंदुत्व म्हणजे सत्ता मिळविण्यासाठीचे संघाचं षडयंत्र : दिग्विजय सिंह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 01:37 PM2019-04-21T13:37:09+5:302019-04-21T13:40:00+5:30
तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे.
भोपाळ - काँग्रेसचे भोपाळ मतदार संघाचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी हिंदुत्व शब्द आपल्या डिक्शनरीत नसल्याचे म्हटले आहे. दिग्विजय यांनी शनिवारी भोपाळमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच हिंदू धर्माविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.
तुम्ही लोक हिंदुत्व शब्दाचा उच्चार का करता, असा सवाल उपस्थित करत दिग्विजय यांनी आपल्या डिक्शनरीत हिंदुत्व शब्द नसल्याचे म्हटले. भोपाळमधून लोकसभेच्या रिंगणात उतरलेले दिग्विजय सिंह यांची लढत प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याशी आहे.
मैं हिंदू धर्म को मानता हूँ, जो हज़ारों सालों से दुनिया को जीने की राह सिखाता आया है।
— digvijaya singh (@digvijaya_28) April 20, 2019
मैं अपने धर्म को हिंदुत्व के हवाले कभी नहीं करूँगा, जो केवल और केवल राजनीतिक सत्ता पाने के लिए संघ का षड्यन्त्र है।
मुझे अपने सनातन हिंदू धर्म पर गर्व है जो वसुदैव क़ुटुम्बकम की बात कहता है।
दरम्यान दिग्विजय यांनी संध्याकाळी एक ट्विट केले, त्यामध्ये ते म्हणाले की, आपण हिंदू धर्माला मानतो. हिंदू धर्म हजारो वर्षांपासून जगाला मार्ग दाखवत आला आहे. परंतु, आपण हिंदु धर्माला हिंदुत्वाच्या हवाली करणार नाही. हिंदुत्व म्हणजे दुसर तिसर काही नसून सत्ता मिळविण्यासाठी संघाच षडयंत्र असल्याचे दिग्विजय यांनी म्हटले आहे. तसेच मला माझ्या सनातन हिंदु धर्मावर आणि त्याच्या 'वसुदैव कुटुंबकम' यावर गर्व असल्याचे दिग्विजय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.