वादग्रस्त वक्तव्य भोवणार; केजरीवालांनी पाठवली गौतम गंभीरला नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 09:49 AM2019-05-12T09:49:55+5:302019-05-12T09:51:27+5:30
गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार गौतम गंभीर आणि भारतीय जनता पक्षाला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गौतम गंभीरने केजरीवाल यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ही नोटीस पाठविण्यात आले आहे. त्यामुळे गौतम गंभीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान आतिशी मार्लेना संदर्भात वादग्रस्त पत्रके वाटल्याचा आरोप गौतम गंभीरवर करण्यात आल्या होता. त्यानंतर गौतम गंभीरने केजरीवाल यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच त्यांच्यावर टीका केली. एका ट्विटमध्ये गंभीरने म्हटले की, मला लाज वाटते की, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी केजरीवाल यांच्या सारखा व्यक्ती बसलेला आहे. तुम्ही अत्यंत घाणेरडे मुख्यमंत्री असून तुमच्याच झाडूने तुमचा मेंदू साफ करण्याची गरज आहे. आम आदमी पक्षाचे चिन्ह झाडू असून त्यावर गंभीरने केजरीवाल यांच्यावर टीका केली.
The notice to Gautam Gambhir seeks immediate apology in writing & asks to publish the same 'along with true & correct facts' in newspapers & on social media, within 24 hours. https://t.co/IUUCvczrge
— ANI (@ANI) May 11, 2019
गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. पुढील २४ तासांच्या आत सत्याला धरून पेपर आणि सोशल मीडियावर माफीनामा प्रकाशित करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.