माजी पंतप्रधानांच्या आयकर परताव्याची नोंदच नाही : पंतप्रधान कार्यालय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 06:11 PM2019-05-27T18:11:55+5:302019-05-27T18:20:10+5:30
माहिती अधिकारातून पंतप्रधानांच्या आयकर परताव्याची माहिती देण्याबाबत, दिलेल्या उत्तरात म्हटले गेले आहे की, माहिती अधिकार नियमानुसार ही माहिती देणे बंधनकारक नाही.
नवी दिल्ली - पंतप्रधान कार्यालयाकडे माजी पंतप्रधानांच्या आयकर परताव्याची कोणतीही नोंद नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीमध्ये हे उघड झाले आहे. पीटीआयने याबाबत माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असता, त्यांना माहिती उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.
माहिती अधिकारातून पंतप्रधानांच्या आयकर परताव्याची माहिती देण्याबाबत, दिलेल्या उत्तरात म्हटले गेले आहे की, माहिती अधिकार नियमानुसार ही माहिती देणे बंधनकारक नाही. मागितलेली माहिती ही वैयक्तिक स्वरुपाची आहे. त्यामुळे, माहिती अधिकार कलम 8 (1) (आय) नुसार ही माहिती देता येणार नाही. असा दावा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आला आहे.
प्रत्यक्षात मात्र कायद्यानुसार, संसेद्त किंवा विधानसभा मध्ये एखादी माहिती दिली जात असेल तर, ती माहिती कोणत्याही व्यक्तीला किंवा सार्वजनिकरीत्या देण्यास टाळता येत नाही. पंतप्रधान मोदींना मागील 18 वर्षात आतापर्यंत 5 वेळा आयकर परतावा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागाच्या कर माहिती नेटवर्कद्वारे रिफंडच्या स्थितीबाबत ऑनलाइन दिल्या जाणाऱ्या माहितीच्या सेवेअंतर्गत ही माहिती मिळाली आहे