मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 16:18 IST2019-04-17T16:12:39+5:302019-04-17T16:18:36+5:30

समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले.

Lok Sabha Election 2019 If Modi tea saler than we are Milk producer : Akhilesh Yadav | मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव

मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव

फरुखाबाद - २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वत:ला चहावाला संबोधले होते. त्यामुळे २०१४ मधील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी चहावाला पंतप्रधान होणार या चर्चेच्या आजुबाजूला फिरत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चहावाला ओळख मागे सोडून चौकीदार रुप धारण केले आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

विरोधकांकडून चौकादार मुद्दावरून मोदींवर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले आहे. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले.

मतदारांना संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, आधी मोदी चहावाला म्हणून जनतेसमोर आले होते. आता तेच मोदी चौकीदार म्हणून समोर आले आहेत. परंतु या चौकीदाराला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे अखिलेश यांनी सांगितले. चहा बविण्यासाठी दुध आवश्यक असल्याचे सांगत ते चहावाले असतील तर आम्ही देखील दुधवाले आहोत. जोपर्यंत दुध चांगल मिळत नाही, तोपर्यंत चहा चांगला होऊ शकत नाही, असा टोला अखिलेश यांनी यावेळी लगावला.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 If Modi tea saler than we are Milk producer : Akhilesh Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.