'चौकीदार' देशातील वातावरण बिघडवत आहे : जया बच्चन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 03:13 PM2019-05-02T15:13:54+5:302019-05-02T15:20:34+5:30
चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे.
लखनौ- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी निशाणा साधला आहे. देशामधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न चौकीदार करत आहे. फक्त माझीच नाहीतर जनतेची सुद्धा हीच भावना झाली आहे, असा टोला जया बच्चन यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना लागवला. लखनौ येथे समाजवादी पक्षाच्या उमेदवार पूनम सिंन्हा यांच्या प्रचारसभेच्या वेळी त्या बोलत होत्या.
चौकीदार शब्दाच्या अवतीभवती सध्या देशाच राजकरण फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यात आता समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन यांनी सुद्धा उडी घेतली आहे. देशामध्ये चौकीदाराची भूमिका महत्वाची असते. परंतु सद्या जो चौकीदार आहे. तोच देशामधील वातावरण बिघडवण्याचा काम करत असल्याचा आरोप जया बच्चन यांनी केला.
जया बच्चन यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्ता आणि मतदार यांना संबोधित करताना म्हणाल्या की , तुम्ही सगळे जण पूनम सिन्हा यांना विजयी करण्याचे मला वचन द्या. नाहीतर त्या मला मुंबईमध्ये जाण्यास मज्जाव करतील. पूनम ह्या माझ्या चांगल्या मैत्रीण असून माझे त्याच्याशी मागील ४० वर्षापासून चांगले संबंध आहेत. असेही जया म्हणाल्या.
आपण सर्वांनी मिळून नविन उमेदवारांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विजयी केले पाहिजे. तुम्ही सगळे जण मोठ्या संख्येने मतदान करावे. आता जो उत्साह मला दिसत आहे. तसाच उत्साह मतदानाच्या दिवशी दाखवा. यावेळी, समजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची जया बच्चन यांनी आपल्या भाषणातून प्रशंसाही केली.