कन्हैया कुमार बेगुसरायमधून पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 03:32 PM2019-05-23T15:32:04+5:302019-05-23T15:35:41+5:30
बेगुसराय हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे कन्हैया कुमार ही निवडणूक जिंकेल असे मत व्यक्त केले जात होते.
मुंबई - बिहार राज्यातील बेगुसरा लोकसभा मतदार संघातून जेएनयूचा माजी विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष कन्हैया कुमार हे निवडणूक लढवत असल्याने ह्या मतदार संघाची मोठी चर्चा झाली होती. मात्र समोर येत असलेल्या कलानुसार कन्हैया हे पिछाडीवर असून त्यांच्या विजय होणे शक्य नसल्याचे अंदाज वर्तवला जात आहे.
कन्हैया कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाकडून लोकसभा मतदार संघातून मैदानात होते. तर, भाजपने गिरीराज सिंह यांना रिंगणात उतरवले होते.निवडणूकीच्या खर्चासाठी जनतेतून वर्गणी करून कन्हैयाने निवडणुकीत प्रचार केला होता. बेगुसराय हा डाव्यांचा बालेकिल्ला मानला जातो त्यामुळे कन्हैया कुमार ही निवडणूक जिंकेल असे मत व्यक्त केले जात होते. पण, गिरीराज सिंह यांनी हा अंदाज फोल ठरवला. सध्या गिरिराज सिंह तब्बल ३ लाख ६६७ हजार ३८९ मतांनी आघाडीवर आहेत. तर कन्हय्या कुमार पिछाडीवर पडला आहे.
जेएनयुमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप कन्हैया कुमारविरोधात करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणारे कन्हैयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना पहायला मिळायचे, त्यामुळे ते चर्चेत आले होते. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळेल असा अंदाज अनेकांनी लावला होता. प्रत्यक्षात मात्र बेगुसरायमधून गिरीराज सिंह यांचे विजय होणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे.