Lok Sabha Election 2019: कन्हैया कुमारचे 'या' भाजप नेत्याला आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:32 PM2019-03-18T14:32:01+5:302019-03-18T14:33:19+5:30
भाजपच्या गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ मित्र पक्ष असलेल्या लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
पटना - भारतीय जतना पक्षाची बिहारमधील मित्र पक्षासोबतची जागा वाटपाची बोलणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि जनता दल युनायटेड प्रत्येकी १७ जागा लढविणार असून लोक जनशक्ती पक्षाला ६ जागा देण्यात आल्या आहेत. बिहारचे प्रदेशाध्यक्ष पशुपती पारस यांनी युतीची घोषणा केली आहे. यामध्ये भाजप नेते गिरीराज सिंह आणि शहनवाज हुसैन यांची जागा मित्र पक्षाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे गिरीराज सिंह यांचा मतदार संघ बदलणार असून त्यांच्या समोर जेएनयू नेते कन्हैया कुमार यांचे आव्हान असण्याची शक्यता आहे.
गिरीराज सिंह यांचा नवादा मतदारसंघ लोक जनशक्ती पार्टीकडे गेला आहे. त्यामुळे गिरीराज सिंह बेगूसराय मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. बेगूसरायमधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून कन्हैया कुमार .यांना तिकीट निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर रामविलास पासवान यांना आसाममधून राज्यसभेवर पाठविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मतदार संघ
भाजप : पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, शिवहर, मधुबनी, अररिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, प्रल्हादपूर, सारण, बेगूसराय, पटना साहिब, पाटलीपूत्र, आरा, बक्सर, उजियारपूर, सासाराम आणि औरंगाबाद
जेडीयू : बाल्मीकिनगर, सीतामढी, सुपौल, किशनगंज, कटिहार, पूर्णिया, मधेपुरा, गोपालगंज, सिवान, भागलपूर, बांका, मुंगेर, नालंदा, झंझालपूर, काराकाज, गया आणि जहानाबाद
लोजपा : हाजीपूर, नवादा, खगडिया, समस्तीपूर, वैशाली आणि जमुई.