Lok Sabha Election 2019 : शत्रुघ्न सिन्हा, कन्हैया कुमार, मीसा भारती पराभवाच्या छायेत ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 14:06 IST2019-05-20T12:04:28+5:302019-05-20T14:06:48+5:30
बिहारमधील दोन लोकसभा मतदार संघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये बेगुसराय आणि पटना साहिब या दोन मतदार संघांचा समावेश आहे. बेगुसरायमधून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे.

Lok Sabha Election 2019 : शत्रुघ्न सिन्हा, कन्हैया कुमार, मीसा भारती पराभवाच्या छायेत ?
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचे मतदान पूर्ण झाले असून आता अनेक संस्थांचे एक्झिटपोल आले आहेत. अनेक एक्झिटपोलमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत दाखवण्यात आले आहे. तर भाजपचे बंडखोर नेते आणि काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा, सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार आणि लालू प्रसाद यादव यांच्या कन्या मीसा भारती पराभवाच्या छायेत असल्याचा अंदाज एक्झिटपोलने वर्तविला आहे.
बिहारमधील दोन लोकसभा मतदार संघावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यामध्ये बेगुसराय आणि पटना साहिब या दोन मतदार संघांचा समावेश आहे. बेगुसरायमधून केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह यांच्यासमोर सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांचे आव्हान आहे. तर पटना साहिबमधून शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
एबीपी नेल्सनच्या एक्झिटपोननुसार बेगुसरायमधून कन्हैया कुमार यांना पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. येथून भाजपचे दिग्गज नेते गिरीराज सिंह आणि कन्हैया कुमार यांच्यात मुख्य लढत आहे. तर काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचा अंदाज आहे. तर पाटलीपुत्रच्या उमेदवार आणि लालू यांच्या कन्या मीसा भारती देखील पराभवाच्या छायेत असल्याचे एक्झिटपोलमध्ये म्हटले आहे. बिहारमध्ये एनडीएला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.
एबीपी नेल्सननुसार बिहारमधील लोकसभा मतदार संघातील ४० पैकी ३४ जागांवर एनडीएचा विजय होण्याची शक्यता आहे. तर युपीएला ६ जागांवर विजय मिळण्याची शक्यता असून इतर पक्षाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज आहे. तर झारखंडमधील १४ पैकी १० जागांवर भाजपला विजय मिळेल अशी शक्यता आहे.