Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 07:30 AM2019-04-18T07:30:10+5:302019-04-18T18:19:04+5:30

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 95 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात 15 कोटी 79 ...

Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान | Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

Next

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांसह देशातील 95 जागांसाठी आज, गुरुवारी मतदान होत असून, त्यात 15 कोटी 79 लाख 34 हजार मतदान आपला हक्क बजावतील. या 96 मतदारसंघांत माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, फारुख अब्दुल्ला, खा. हेमा मालिनी, खा. कणिमोळी, राज बब्बर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, कार्ती चिदम्बरम, तारीक अन्वर यांच्यासह 1600 उमेदवार रिंगणात आहेत.

महाराष्ट्रासह 12 राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात हे मतदान होणार असून, तामिळनाडूतील वेल्लोर मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, नांदेड, हिंगोली, बीड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर बुलडाणा या 10 मतदारसंघांचाही त्यात समावेश आहे. याशिवाय तामिळनाडू (38), कर्नाटक (14), बिहार, ओडिशा व आसाम (प्रत्येकी 5), उत्तर प्रदेश (8),पश्चिम बंगाल व छत्तीसगढ ( प्रत्येकी 3), जम्मू-काश्मीर (2) तर मणिपूर,त्रिपुरा (प्रत्येकी एक) या राज्यांतील तसेच केंद्रशासित प्रदेश पुडुच्चेरी ( प्रत्येकी ) मध्येही मतदान होईल.

तामिळनाडूतील वेल्लोरची निवडणूक रद्द झाली असून, त्रिपुरा (पूर्व) मध्ये आता गुरुवारऐवजी 23 एप्रिल रोजी मतदान होईल. या टप्प्यामध्ये केंद्रीय मंत्री ज्युअल ओराम, सदानंद गौडा आणि पी.राधाकृष्णन्, काँग्रेसचे वीरप्पा मोईली, द्रमुकचे दयानिधी मारन, ए. राजा, शिवसेनेचे आनंदराव अडसुळ, भाजपच्या प्रीतम मुंडे, काँग्रेसप्रणित आघाडीतील युवा स्वाभिमानीच्या नवनीत राणा यांचे भवितव्यही ठरणार आहे. ओडिशा विधानसभेच्या 35 जागांसाठीही गुरुवारीच मतदान होत असून, त्यात मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजेपूर मतदारसंघाचाही समावेश आहे. ते दोन मतदारसंघांतून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

LIVE

Get Latest Updates

06:18 PM

देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान



 

05:00 PM

देशभरात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ५० टक्के मतदान

दुपारी ३ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ४६.६३ टक्के, तामिळनाडू - ५२.०२ टक्के, ओडिशा - ५३ टक्के, मणिपूर - ६७.५ टक्के, उत्तर प्रदेश- ५०.३९ टक्के, छत्तीसगड- ५९.७२ टक्के, कर्नाटक-४९.२६ टक्के मतदान झाले. 



 

04:41 PM

पद्म पुरस्कार विजेत्या शालुमारदा थिम्मका यांनी केलं मतदान

कर्नाटकमधील १०७ वर्षीय पद्म पुरस्कार विजेत्या शालुमारदा थिम्मका यांनी बंगळुरु ग्रामीण लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला. 



 

04:03 PM

पश्चिम बंगालमध्येही दुपारी ३ पर्यंत ६५.४३ टक्के मतदान

पश्चिम बंगालमध्ये दुपारी ३ वाजेपर्यंत जलपईगुरी ७१.३२ टक्के, दार्जिलिंग - ६३.१४ टक्के, रायगंज- ६१.८४ टक्के मतदान झाले. 



 

04:00 PM

जम्मू काश्मीरमध्ये दुपारी ३ पर्यंत ३८.५ टक्के मतदान तर श्रीनगरमध्येही मतदानाचा उत्साह



 

03:38 PM

९५ वर्षीय वृद्ध मतदाराचा मतदानाच्या रांगेत मृत्यू

ओडिशा येथे ९५ वर्षीय वृद्ध मतदार गंजम मतदान केंद्रावर रांगेत उभे असताना कोसळले, त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र हॉस्पिटलने त्यांना मृत घोषित केले.  



 

03:10 PM

छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांनी कुटुंबीयांसह केलं मतदान

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमन सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांनी राजनंदगाव लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. 



 

03:03 PM

कुमारस्वामींच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाकडून तपासणी

उत्तर कर्नाटकामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली त्याचसोबत त्यांचे सामानही तपासले गेले. 



 

02:51 PM

दुपारी १ वाजेपर्यंत महाराष्ट्रात ३५.४ टक्के मतदान



 

01:34 PM

कर्नाटकचे मंत्री डी.के.शिवकुमार यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

12:50 PM

पश्चिम बंगालच्या रायगंजमधील CPM उमेदवार मोहम्मद सलीम यांच्या ताफ्यावर हल्ला



 

12:43 PM



 

12:43 PM



 

12:30 PM

तामिळनाडूमध्ये अकरा वाजेपर्यंत टक्के 30.62 टक्के मतदान



 

12:13 PM



 

12:13 PM

अकरा वाजेपर्यंत आसाममध्ये 26.39 टक्के तर छत्तीसगडमध्ये 26.2 टक्के मतदान



 

12:06 PM

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी आपल्या कुटुंबीयांसह केलं मतदान

12:03 PM

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

11:58 AM

उत्तर प्रदेशमध्ये 11वाजेपर्यंत 24.31% मतदान



 

11:43 AM



 

11:43 AM

बिहार - 5, अकरा वाजेपर्यंत 18.97 टक्के मतदान



 

11:24 AM

मणिपूर - 1, अकरा वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान



 

11:22 AM



 

11:09 AM

अभिनेते रजनीकांत यांनी केलं मतदान

10:55 AM

आसाम : 5, 9 वाजेपर्यंत 9.51 टक्के मतदान



 

10:46 AM



 

10:40 AM

न्यायासाठी मतदान करा; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं मतदारांना आवाहन



 

10:36 AM



 

10:34 AM

बिहार - 5, दहा वाजेपर्यंत 19.5 टक्के मतदान



 

10:33 AM

छत्तीसगडमध्ये निवडणूक कर्मचार्‍याचा हार्ट अटॅकने मृत्यू



 

10:26 AM

राज बब्बर यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

10:23 AM



 

10:23 AM



 

10:22 AM



 

10:05 AM

जम्मू-काश्मीर (2 जागा), 9 वाजेपर्यंत 0.99 टक्के मतदान



 

09:58 AM

तामिळनाडूच्या 39 पैकी 38 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार



 

09:54 AM

बिहारमधील भागलपूरमध्ये 90 वर्षांच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क



 

09:48 AM

जम्मू-काश्मीर : 2, मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा



 

09:37 AM



 

09:34 AM



 

09:33 AM

सकाळी 9 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी



 

09:32 AM

कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

09:28 AM



 

09:24 AM



 

09:23 AM



 

09:23 AM

बिहार - 5, आठ वाजेपर्यंत 12.27 टक्के मतदान



 

09:19 AM



 

09:18 AM



 

09:18 AM

तामिळनाडूच्या 38 जागांचे एकाच टप्प्यात मतदान



 

09:11 AM

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

09:06 AM

ओडिशा विधानसभेच्या 35 जागांसाठी मतदान



 

09:02 AM



 

09:01 AM



 

09:01 AM



 

08:57 AM

किरण बेदी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:49 AM

बंगळुरू : प्रसिद्ध अभिनेते आणि बंगळुरू मध्य मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार प्रकाश राज यांचं मतदान



 

08:46 AM

पश्चिम बंगाल : 3



 

08:44 AM

पुद्दुच्चेरीचे मुख्यमंत्री वी. नारायणसामी यांनी बजावला मतदानाचा हक्क


08:34 AM

मणिपूर : 1



 

08:34 AM

बिहार - 5, आठ वाजेपर्यंत 5.73 टक्के मतदान



 

08:30 AM

किरण बेदी यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:27 AM

तामिळनाडूच्या 39 पैकी 38 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे.



 

08:21 AM

आसाममधील सिलचर येथे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड, मतदान प्रक्रिया खोळंबली



 

08:19 AM

मक्कल नीधी मयम पक्षाचे अध्यक्ष अभिनेता कमल हासन, अभिनेत्री श्रुति हासन यांनी चेन्नईत केलं मतदान



 

08:18 AM

संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

08:01 AM

काही ठिकाणी ईव्हीएमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मतदानास उशीर



 

07:58 AM

तामिळनाडू : माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम ,मुलगा कार्ती चिदंबरम आणि सून श्रीनिधी रंगराजनने बजावला मतदानाचा हक्क



 

07:56 AM

दुसऱ्या टप्प्यात 95 जागांसाठी मतदानास सरुवात



 

07:56 AM

आसाममधील सिलचर येथे व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड



 

07:54 AM

सुपरस्टार रजनीकांत यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

07:52 AM

काँग्रेसचे नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बजावला मतदानाचा हक्क



 

07:49 AM

त्रिपुरा (पूर्व) मध्ये आता गुरुवारऐवजी 23 एप्रिल रोजी मतदान होईल



 

07:48 AM



 

07:47 AM

जम्मू-काश्मीर : 2



 

07:38 AM

मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा



 

07:37 AM

छत्तीसगड : 3



 

07:36 AM

आसाम : 5



 

07:35 AM

15 कोटी 79 लाख 34 हजार मतदान आपला हक्क बजावतील



 

07:34 AM



 

07:34 AM



 

07:33 AM



 

07:33 AM

आज मतदानाचा दुसरा टप्पा



 

07:31 AM



 

07:31 AM



 

07:31 AM



 

Web Title: Lok Sabha Election Voting Live : देशात दुसऱ्या टप्प्यात संध्याकाळी ५ पर्यंत ६१.१२ टक्के मतदान

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.