समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मायावतींकडून कानपिचक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 01:33 PM2019-04-21T13:33:11+5:302019-04-21T13:34:06+5:30
बसपा प्रमुख मायावती यांची शनिवारी सपा नेते रामगोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा आयोजित करण्यात आली होती. फिरोजाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करणाऱ्या मायवती यांनी अचानक सपा कार्यकर्त्यांना खडसावले.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशात भाजपला रोखण्यासाठी कट्टर प्रतिस्पर्धी असलेले बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्ष एकत्र आले आहे. एकत्र आल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र सभा घेत मतदारांना महाआघाडीला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. मात्र एका सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी सपा कार्यकर्त्यांना खडसावले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
बसपा प्रमुख मायावती यांची शनिवारी सपा नेते रामगोपाल यादव यांचे चिरंजीव अक्षय यादव यांच्या समर्थनात सभा आयोजित करण्यात आली होती. फिरोजाबाद येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर कडाडून टीका करणाऱ्या मायवती यांनी अचानक सपा कार्यकर्त्यांना खडसावले. तसेच त्यांना कानपिचक्या देखील दिल्या.
मायावती सभेला संबोधित करत असताना सपा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे मायावती थोड्या नाराज झाल्या. तसेच कार्यकर्त्यांना खडसावताना मायावती म्हणाल्या की, तुम्ही बसपाच्या कार्यकर्त्यांकडून काही तरी शिकायला हवे. बसपा कार्यकर्त्यांची शिस्त तुम्ही घ्यायला हवी. बसपा कार्यकर्ते पक्षाचं आणि पक्षाध्यक्षाचं शांततेने ऐकूण घेत असल्याचे देखील मायावती यावेळी म्हणाल्या.
या सभेत मायवती यांनी मोदींवर टीका करताना चौकीदारीची नाटकबाजी तुम्हाला वाचवू शकणार नाही, असं म्हटले. तसेच छोटे-मोठे कितीही चौकीदार जमा करा, तुम्हाला पराभवापासून कोणीही रोखू शकणार नाही, असंही मायावती यांनी म्हटले.