पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा का ? अखिलेश यादवांनी दिले 'हे' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 04:32 PM2019-05-07T16:32:52+5:302019-05-07T16:35:25+5:30

सपा पंतप्रधानपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात अखिलेश यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सर्वांना ठावूकच आहे, पंतप्रधानपदासाठी आपला कुणाला पाठिंबा आहे.

Lok Sabha Election 2019 mayawati for pm akhilesh yadav explains his stand | पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा का ? अखिलेश यादवांनी दिले 'हे' उत्तर

पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा का ? अखिलेश यादवांनी दिले 'हे' उत्तर

Next

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे दोन टप्पे बाकी आहेत. सध्या देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांकडून पंतप्रधानपदासाठीच्या शक्यता वर्तविण्यात येत आहे. या संदर्भात समाजवादी पक्षाचे प्रमुख यांना विचारण्यात आले. त्याचे उत्तर अखिलेश यांनी गुलदस्त्यातच ठेवले आहे.

सपा पंतप्रधानपदासाठी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांना पाठिंबा देणार का, असा प्रश्न विचारण्यात अखिलेश यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, सर्वांना ठावूकच आहे, पंतप्रधानपदासाठी आपला कुणाला पाठिंबा आहे. विविध पक्षांचा पाठिंबा मिळविण्यासाठी मायावती यांनी प्रयत्न करावा. तरी पंतप्रधानपदासाठीचा निर्णय २३ मे रोजीच्या निकालानंतर घेण्यात येईल, अस अखिलेश यादव यांनी सांगितले.

पंतप्रधान उत्तर प्रदेशातून व्हावा, असं सांगताना वाराणसीतून नको, वाराणसीवाल्याने देशाचं मोठ नुकसान केल्याचा टोला देखील अखिलेश यांनी मोदींना लगावला. दरम्यान मायावती यांना पाठिंबा किंवा महायुतीसंदर्भातील निर्णय चर्चा करून घेणार असल्याचे अखिलेश यांनी स्पष्ट केले. तसेच पंतप्रधानपदासाठी पाठिंबा कुणाला याचा निर्णय देखील निकालानंतरच असंही अखिलेश यांनी सांगितले.

निवडणुकीचे अद्याप दोन टप्पे बाकी आहेत. त्यापूर्वी भाजप काय डाव खेळणार हे देखील पाहणे गरजेचे आहे. पंतप्रधान एका सभेत म्हणाले की, समाजवादी पार्टीने काँग्रेसशी हातमिळवणी करत मायावतींना धोका दिला आहे. परंतु, आपण मायावती यांच्यासोबत आहे. तसेच पंतप्रधान होण्याचा आपला काही इरादा नसून पंतप्रधान करण्यासाठी आम्ही उभे राहु, असंही अखिलेश यांनी म्हटले.

 

 

Web Title: Lok Sabha Election 2019 mayawati for pm akhilesh yadav explains his stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.