Lok Sabha Election 2019: देशात मोदी सुसाट अन् सोशल मीडियावर मीम्सची लाट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 02:08 PM2019-05-23T14:08:19+5:302019-05-23T14:27:14+5:30
सोशल मीडियावर मीम्सची बहार
नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक निकालाचं चित्र आता बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचं मतमोजणीवरुन दिसून येत आहे. भाजपा आणि मित्रपक्षांना जवळपास साडे तीनशे जागा मिळतील, असं आकडेवारीवरुन दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर मीम्सची लाट उसळली आहे.
Players who scored 300+ Twice:
— Farrago Abdullah (@abdullah_0mar) May 23, 2019
Chris Gayle
Brian Lara
Virender Sehwag
Narendra Modi.#ElectionResults2019pic.twitter.com/itiIchf7Dd
एनडीएनं 300 जागांचा टप्पा ओलांडताच अनेकांच्या सृजनशीलतेला बहार आली. दोनदा त्रिशतक झळकावणाऱ्या खेळाडूंसोबत त्यांची तुलना होऊ लागली. ब्रायन लारा, ख्रिस गेल, विरेंद्र सेहवाग यांच्यासोबतचे त्यांचे फोटोदेखील व्हायरल झाले. आता वेस्ट इंडिजसोबत भारताच्याही दोन खेळाडूंनी दोनवेळा त्रिशतक साजरा केलं आहे, या अर्थाच्या मीम्स व्हायरल झाल्या आहेत.
Kaisa feel kar rahe?
— Shalini Shukla (@Shalini__Shukla) May 23, 2019
Bjp Supporters : pic.twitter.com/ITlQGhMEjw
BJP supporters today.#ElectionResults2019pic.twitter.com/kN3UG6yBzS
— Harshvardhan Agrawal (@Harsh_humour) May 23, 2019
#ElectionResults2019 All anti BJP supporters right now pic.twitter.com/rU8VAVsRso
— Ambikesh (@ambikeshtiwari9) May 23, 2019
सध्या भाजपा समर्थकांची स्थिती कशी आहे, हे दाखवण्यासाठी अनेकांनी क्रिकेटपटू इमरान ताहीरच्या फोटोंचा आधार घेतला आहे. इम्रानच्या गळ्यात भाजपाचं उपरणं असलेला फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तर आता वर्ल्ड कपदेखील भाजपानंच खेळावा. आपण नक्की विजयी होऊ, अशी पोस्टदेखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अवस्थेवरदेखील जोरदार टोलेबाजी सुरू आहे.