मोदींच्या सभेसाठी उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 01:00 PM2019-04-17T13:00:35+5:302019-04-17T13:00:43+5:30
रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.
मुंबई – उत्तर प्रदेशच्यावाराणसीमधील कचनार गावात २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी १० एकर जमीन वापरण्यात आली होती. सभा घेण्यात आलेल्या जमिनीवरील उभे पीक नष्ट करण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र एक वर्ष उलटूनही अद्याप संबंदीत शेतकऱ्यांला भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
वाराणसीमधील कचनार येथे १४ जुलै २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर समोरच भव्य व्यासपीठ उभारण्यात आला होता. येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगींची विशेष सोय करण्यात आली होती. कचनार येथील रॅलीसाठी परिसरातील सात शेतकऱ्यांच्या जमिनाचा वापर करण्यात आला होते.
रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांनी अनकेदा प्रशासनाकडे लेखी तक्रार करून हि काहीच फायदा झाला नाही.त्यामुळे शेतकरी हतबल झाली आहेत.
कचनार गावातील रॅलीसाठी चमला देवी यांच्या शेतात उभ्या पिकात चार ट्रक वाळू टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आपली जमीनीच्या मशागत करायला नेहमीपेक्षा तीन पट जास्त खर्च आला. आधी जमीन मशागत करण्यासाठी जिथे दोन हजार रुपये लागत असे तिथे १२ हजार रुपये असल्याचे चमला देवी माध्यमांशी बोलताना सांगत होत्या.