Narendra Modi: 'सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा; जनतेचा विश्वास आणखी वाढेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2019 07:43 PM2019-05-25T19:43:24+5:302019-05-25T19:47:40+5:30

सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते.

Lok Sabha Election 2019: People have accepted us due to our 'seva bhav', says Narendra Modi | Narendra Modi: 'सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा; जनतेचा विश्वास आणखी वाढेल'

Narendra Modi: 'सत्ताभाव सोडा, सेवाभाव जोडा; जनतेचा विश्वास आणखी वाढेल'

googlenewsNext
ठळक मुद्देआपलं 'सरकार पार्ट २' कसं चालवायचंय, या संदर्भात मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं.'सत्ताभाव जसजसा कमी होत जाईल, तसतसा सेवाभाव वाढत जाईल आणि जनतेचा विश्वासही दृढ होईल'एनडीएच्या नेतेपदाची माळ नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडली आहे.

लोकसभा निवडणुकीत मोदी लाट-२ उसळल्यानंतर आज एनडीएच्या नेतेपदाची माळ नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात पडली असून ३५३ खासदारांनी पंतप्रधानपदासाठी त्यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आजच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटू मोदी सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. हे आपलं 'सरकार पार्ट २' कसं चालवायचंय, या संदर्भात मोदींनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सर्व खासदारांना मार्गदर्शन केलं.   

'देशवासीयांनी प्रचंड जनादेश दिला आहे आणि तो जबाबदारी वाढवणारा आहे. भारतीय लोकशाही आपल्याला समजून घ्यावी लागेल. मतदारांचा नीरक्षीरविवेक कुठल्याही पट्टीने मोजता येणार नाही. लोकशाही अधिकाधिक प्रगल्भ होतेय. सत्ताभाव, सत्तेची हाव जनता स्वीकारत नाही. याउलट, सेवाभावापुढे ती नतमस्तक होते. सत्तेच्या खुर्चीत बसून हा सेवाभाव जपणं कठीण जाऊ शकेल. पण सत्ताभाव जसजसा कमी होत जाईल, तसतसा सेवाभाव वाढत जाईल आणि जनतेचा विश्वासही दृढ होईल', असा मोलाचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी दिला. 



* मोदींच्या भाषणातील ठळक मुद्देः 

>> जीव मे ही शिव है. जनसेवा हीच ईश्वरसेवा, याहून देशहिताचा दुसरा मार्ग असू शकत नाही. 

>> खांद्याला खांदा लावून आपल्याला काम करायचंय. मीही तुमच्यातलाच एक आहे. फक्त, आपल्या सरकारकडून कधी काही चूक झाली, तर तिची जबाबदारी एका खांद्यावर घेणारा एक नेता हवा, म्हणून मीही जबाबदारी स्वीकारतोय आणि ती पारही पाडेन.  



     
>> एवढा मोठा विजय पाहून छाती फुगून येणं स्वाभाविक आहे. 'आता बघून घेतो तुला', असंही काही जणांबद्दल वाटू शकतं. परंतु, लोकप्रतिनिधीच्या मनात हा आपपरभाव असता कामा नये. आज ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला त्यांच्यासाठीही आणि ज्यांचा विश्वास जिंकायचा आहे त्यांच्यासाठीही आपल्याला काम करायचं आहे. तेव्हाच 'सब का साथ, सब का विकास' हे ब्रीद प्रत्यक्षात येईल.

>> संविधानाने आपल्याला जबाबदारी दिली आहेच, पण मानवीय दृष्टिकोनातूनही मनं जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा.  


Web Title: Lok Sabha Election 2019: People have accepted us due to our 'seva bhav', says Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.