आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:44 PM2019-05-23T18:44:03+5:302019-05-23T18:48:23+5:30

सर्वांना त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याचं आवाहन

lok sabha election 2019 PM Modi Drops Chowkidar Prefix From Twitter Profile | आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

आता नरेंद्र मोदी 'चौकीदार' राहिले नाहीत; स्वतःच सांगितलं कारण!

Next

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनीट्विटरवर त्यांच्या नावापुढे असणारा चौकीदार शब्द हटवला आहे. संध्याकाळी सहानंतर मोदींनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरील चौकीदार शब्द हटवला. आता चौकीदार स्पिरीट नव्या पातळीवर न्यायची वेळ आली असल्याचं ट्विट मोदींनी केलं आहे. मोदींनी त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवल्यानं आता भाजपाचे इतर नेते आणि मंत्रीदेखील त्यांच्या नावापुढील चौकीदार शब्द हटवण्याची शक्यता आहे. 




'चौकीदाराचं स्पिरीट प्रत्येक क्षणी जिवंत ठेऊया आणि भारताच्या विकासासाठी काम करूया. माझ्या ट्विटर अकाऊटंवरुन चौकीदार शब्द हटवतोय. पण तो माझा अभिन्न हिस्सा राहील. तुम्ही सर्वांनीदेखील असंच करावं अशी विनंती करतो,' असं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मोदींनी दुसऱ्या एका ट्विटमधून देशातील जनतेचं कौतुक केलं. 'जनता चौकीदार झाली आणि त्यांनी देशाची सेवा केली. जातीयवाद, भ्रष्टाचार, भांडवलवाद यांच्यासारख्या राक्षसांपासून देशाचं संरक्षण करण्यासाठी चौकीदार शब्द अतिशय सामर्थ्यशाली ठरला,' असं मोदींनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं. 







त्याआधी मोदींनी शानदार विजयाबद्दल जनतेचे आभार मानले. 'भारताचे धन्यवाद! आमच्या आघाडीवर जनतेनं व्यक्त केलेला विश्वास आम्हाला लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत करण्याची शक्ती देतो,' अशा शब्दांत मोदींनी जनतेला धन्यवाद दिले. या ट्विटमधून त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानले. 'भाजपा कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल मी त्यांचे आभार मानतो. सरकारचा विकासाचा अजेंडा तळागाळापर्यंत नेण्यासाठी ते लोकांच्या घरोघरी गेले,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

Web Title: lok sabha election 2019 PM Modi Drops Chowkidar Prefix From Twitter Profile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.