मोदींचा 'सर्जिकल स्ट्राईक'संदर्भातील खुलासा; 'या' अभिनेत्याने उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2019 01:22 PM2019-05-12T13:22:57+5:302019-05-12T13:28:34+5:30
पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नरेंद्र मोदी यांनी बालाकोटमध्ये भारताकडून करण्यात आलेल्या स्ट्राईकसंदर्भात एक खुलासा करण्यात आला आहे. मात्र मोदींचा हा खुलासा सोशल मीडियावर गंमतीचा विषय ठरत आहे. मोदींच्या या खुलाशाची बॉलिवूड अभिनेत्याने खिल्ली उडवली आहे.
अभिनेता आणि दिग्दर्शक कमाल खान याने मोदींच्या खुलाशाची फिरकी घेतली. यावर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान मोदी मुलाखतीत म्हणाले होते की, 'बालाकोट एअरस्ट्राईकच्या वेळी अचानक हवामान खराब झाले. त्यामुळे अशा स्थितीत भारतीय वैमानिक पाकिस्तान सीमेत दाखल होतील का यावर संशय होता. त्यातच वैज्ञानिकांनी सर्जिकल स्ट्राईकची तारिख बदलण्यास सांगितले. मात्र माझ्या डोक्यात दोन विषय होते, एक म्हणजे गुप्तता आणि दुसरी म्हणजे आपण काही फार मोठे वैज्ञानिक नाही. मात्र त्यानंतर मी म्हणालो की, एवढ्या मोठ्या प्रमाणात आभाळ आणि पाऊस असेल तर त्याचा आपल्याला लाभही होऊ शकतो. त्यामुळे आपण पाकिस्तानच्या रडारमध्ये दिसणार नाही. या आभाळाचा आपल्याला लाभ होईल, असं आपण सांगितले. त्यामुळे सगळेच द्विधा मनस्थितीत होते. अखेरीस मीच म्हणालो, आभाळ आलेले आहे, चला पुढे जाऊ या...', असं मोदींनी मुलाखतीत सांगितले.
If PM Modi Ji will continue giving such interesting interviews, then Kapil Sharma show will be off air soon. https://t.co/qgAdKTMfJW
— KRK (@kamaalrkhan) May 11, 2019
मोदींच्या या खुलाशावर अभिनेता कमाल खान म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमचे धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला कळलं की पाकिस्तानने रडारच्या जागी टाटा स्कायची छत्री बसवली आहे. त्यामुळे पाकिस्तानी सैन्याला सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी आकाशातील भारतीय सैन्याचे विमानं दिसली नाहीत, असं म्हणत कमाल खानने मोदींवर टीका केली आहे.
Thanks to PM Modi Ji, Today I came to know that Pakistan has installed Tata Sky Chatri in place of Radars, So Pak army didn’t see Indian fighter jets in the cloudy weather at the time of surgical strikes.🤪
— KRK (@kamaalrkhan) May 11, 2019
कमाल खान यांच्या या ट्विटवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. तर काहींनी मोदींच्या मुलाखतीतील बोलतानाचा भाग ट्विट केला आहे.