Lok Sabha Election 2019 : व्होटर ID हे दहशतवाद्यांच्या IED पेक्षा जास्त शक्तिशाली - नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 10:47 AM2019-04-23T10:47:06+5:302019-04-23T10:59:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे शतक पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं आहे. आपला देश लोकशाहीच्या श्रेष्ठत्वाचं उदाहरण जगाला देतो, असं सांगत मोठ्या संख्येनं नवमतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. देशभरात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क बजावला आहे. आयईडी हे दहशतवादाचं शस्त्र असतं. तर व्होटर आयडी हे लोकशाहीचं प्रभावी शस्त्र आहे असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगरमधील केंद्रावर मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरात राज्यामध्ये 26 जागांसाठी मतदान होत आहे. मतदान करण्यापूर्वी नरेंद्र मोदी गांधीनगर येथील निवासस्थानी गेले. निवासस्थानी त्यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (23 एप्रिल) सकाळी अहमदाबादमधील रानिप येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
#WATCH PM Narendra Modi after casting his vote in Ahmedabad says, " The weapon of terrorism is IED, the strength of democracy is voter ID." #LokSabhaElections2019pic.twitter.com/X0LBPI5qcu
— ANI (@ANI) April 23, 2019
'आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीतील या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कुंभमेळ्यात गंगास्नान केल्यावर पवित्रतेचा अनुभव येतो. तसेच लोकशाहीत मतदान करुन पवित्रतेचा अनुभव येतो. देशातील सर्व मतदारांना मी आवाहन करतो की त्यांनी उत्साहाने या मतदान प्रकियेत सहभागी व्हावे. भारतीय मतदार हा समजूतदार आहे. त्याला खरे आणि खोटे समजते' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
PM Narendra Modi in Ahmedabad: The weapon of terrorism is IED, the strength of democracy is voter ID. I can say with surety that the voter ID is much much more powerful than an IED, so we should understand the strength of our voter IDs. #LokSabhaElections2019pic.twitter.com/AqcL1F955D
— ANI (@ANI) April 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे शतक पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचं आहे. आपला देश लोकशाहीच्या श्रेष्ठत्वाचं उदाहरण जगाला देतो, असं सांगत मोठ्या संख्येनं नवमतदारांनी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. एकीकडे दहशतवादाचे शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीतील शस्त्र व्होटर आयडी असते, व्होटर आयडी हे आयईडीपेक्षाही जास्त शक्तिशाली आहे. आपण या व्होटर आयडीचे महत्त्व समजून घ्यावे आणि जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे मोदींनी म्हटले आहे.
PM Modi: Today third phase of polling is underway, I am fortunate that I also got the opportunity to fulfill my duty in my home state of Gujarat. Like you feel pure after a holy dip in Kumbh, one feels pure after casting vote in this festival of democracy pic.twitter.com/yzjBd3Kpfz
— ANI (@ANI) April 23, 2019
Lok Sabha Election 2019 : आईच्या आशीर्वादानंतर पंतप्रधान मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
मतदानापूर्वी पंतप्रधान मोदींनी आपल्या आईचे आशीर्वाद घेतले. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी मोदी यांच्या कपाळावर टिळा लावून त्यांचे स्वागत करत त्यांचे तोंड गोड केले. या वेळी त्यांनी मोदी यांना एक नारळ, 500 रुपये आणि मिश्री (मिठाई) भेट दिली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही मोदींनी मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी आईचे आशीर्वाद घेतले होते. गुजरात राज्यामध्ये 26 जागांसाठी मतदान होत आहे. काही वेळ आईसोबत गप्पा मारल्यानंतर मोदी मतदान केंद्राच्या दिशेने रवाना झाले.
PM Narendra Modi after casting his vote at a polling booth in Ranip,Ahmedabad #Gujarat#LokSabhaElections2019pic.twitter.com/B6jDiRf2ka
— ANI (@ANI) April 23, 2019
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
#WATCH PM Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence in Gandhinagar and takes her blessings. #Gujaratpic.twitter.com/uRGsGX0fcw
— ANI (@ANI) April 23, 2019
देशात तिसऱ्या टप्प्यातील ११७ मतदारसंघांत मतदानाला सुरुवातhttps://t.co/0TbEKGXFp8#LokSabhaElections2019
— Lokmat (@MiLOKMAT) April 23, 2019