'बसपा-सपा'ला धक्का; योगींचं गोरखपूर जिंकणारा खासदारच भाजपमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 16:10 IST2019-04-04T16:08:03+5:302019-04-04T16:10:21+5:30
गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणारा गोरखपूर मतदार संघ सपा-बसप-निषाद युतीने जिंकला होता. या मतदार संघात मागील कित्येक वर्षांपासून योगी निवडून येत होते. परंतु, योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा मतदार संघ रिक्त झाला होता.

'बसपा-सपा'ला धक्का; योगींचं गोरखपूर जिंकणारा खासदारच भाजपमध्ये दाखल
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदार संघातून शानदार विजय मिळवणारे बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि निषाद पक्षाचे प्रविण निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बसपा आणि सपा यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. निषाद यांना भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत योगी आदित्यनाथ यांचा गड मानल्या जाणारा गोरखपूर मतदार संघ सपा-बसप-निषाद युतीने जिंकला होता. या मतदार संघात मागील कित्येक वर्षांपासून योगी निवडून येत होते. परंतु, योगी मुख्यमंत्री झाल्यानंतर हा मतदार संघ रिक्त झाला होता.
गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत प्रविण निषाद यांनी बसपच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीपूर्वीच निषाद यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे बसपा-सपाला मोठा धक्का बसला आहे. या भागात निषाद पक्षाचे वर्चस्व असून निषाद समाजाचे तीन लाख मतदान आहेत. गोरखपूर मतदार संघात निषाद महत्त्वपूर्ण घटक मानला जातो. पोटनिवडणुकीत निषाद समाज भाजपच्या विरोधात होता, त्यामुळे प्रविण निषाद यांचा विजय झाला आहे.
प्रविण निषाद यांनी दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपने नेते जे.पी. नड्डा यांनी त्यांचे स्वागत केले. प्रविण निषाद हे निषाद पक्षाचे चेअरमन संजय निषाद यांचे चिरंजीव आहे.