व्हिडिओ : रोड शोमध्ये 'मोदी-मोदी'च्या घोषणा; प्रियंका गांधींनी गाडी थांबवून असं दिलं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 10:48 AM2019-05-14T10:48:40+5:302019-05-14T10:49:02+5:30
प्रियंका गांधी यांचा सोमवारी इंदुरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. शहरातील रामचंद्र नगर भागातील काही लोकांनी प्रियंका यांची गाडी पाहून मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान आणखी शिल्लक आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. अनेक नेत्यांच्या सभा आणि रोड शो सुरू आहेत. त्यातच प्रियंका गांधी यांच्या रोड शो संदर्भात बातमी आली आहे. प्रियंका यांच्या रोड शोमध्ये काही लोकांनी मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. त्याला प्रियंका यांनी आपल्या स्टाईलमध्ये उत्तर दिले.
प्रियंका गांधी यांचा सोमवारी इंदुरमध्ये रोड शो आयोजित करण्यात आला होता. शहरातील रामचंद्र नगर भागातील काही लोकांनी प्रियंका यांची गाडी पाहून मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. प्रियंका यांनी हे पाहून लागेच गाडी थांबवून चाणाक्ष नेत्याप्रमाणे घोषणा देणाऱ्यांशी हात मिळवला. तसेच त्यांना 'ऑल द बेस्ट' म्हटले. त्यामुळे मोदी-मोदीचे नारे लगावणारे लोक आश्चर्यचकित झाले.
इंदौर में कुछ लोगों ने प्रायोजित तरीक़े से मोदी-मोदी के नारे लगाए तो प्रियंका गांधी ने कार से उतर कर नारे लगाने वालों से हाथ मिलाया और कहा “आप अपनी जगह, मैं मेरी जगह ‘आल दी बेस्ट”।
— MP Congress (@INCMP) May 13, 2019
इसे कहते हैं देश की मिट्टी, देश की जनता और देश के कण-कण से प्यार।
काश...मोदी भी देश को समझ पाते। pic.twitter.com/dEYL7CdaKI
या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसच्या वतीने ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटले की, इंदुरमध्ये काही लोकांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रियंका गांधी यांच्यासमोर घोषणाबाजी केली. त्यावर प्रियंका यांनी घोषणा देणाऱ्यांशी हात मिळवत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियंका यांनी म्हटले की, जनतेचे मोदींवर किती आहे. परंतु, जततेच प्रेम मोदींना कळायला हवं होतं.