साध्वी प्रज्ञा सिंह महान संत : उमा भारती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 11:02 AM2019-04-28T11:02:02+5:302019-04-28T12:15:22+5:30
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारतींनी संत म्हणून संबोधल्याने प्रज्ञा सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
मुंबई - केंद्रीय मंत्री आणि जेष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी भोपाळ लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना संत म्हणून संबोधले. साध्वी प्रज्ञा सिंह यांच्याशी माझी तुलना होऊ शकत नाही असे मत उमा भारतींनी व्यक्त केले. मध्य प्रदेश मधील खजुराहो लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार बीडी शर्मा यांच्या प्रचारार्थ आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर महान संत असून मी एक सर्वसाधारण मनुष्य आहे. त्यांच्यात आणि माझ्यात खूप अंतर आहे. त्यामुळे, माझी त्यांच्याबरोबर तुलना होऊच शकत नाही. प्रज्ञा सिंह मध्यप्रदेश मध्ये तुमची जागा घेतील का असे त्यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले.
Union Minister and BJP leader Uma Bharti on being asked if Pragya Singh Thakur will take her place in Madhya Pradesh politics: She is a great saint, don't compare me with her, I'm just an ordinary and foolish creature. (27.4.19) pic.twitter.com/rxfgDoRTFf
— ANI (@ANI) April 28, 2019
मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजपने भोपाल मधून उमेदवारी दिल्यापासून त्या नेहमीत चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि योगगुरू रामदेवबाबा यांनी आधीच प्रज्ञा सिंह यांना पाठिबा दर्शवला आहे. त्यातच आता उमा भारतींनी संत म्हणून संबोधल्याने प्रज्ञा सिंह पुन्हा चर्चेत आल्या आहेत.
विशेष म्हणजे, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी उमा भारती यांची प्रशंसा करताना म्हटले होते की, उमा भारती माझी मोठी बहीण आहे. मोठ्या बहिणीने १६ वर्षापूर्वी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांना हरवले होते. पुन्हा आता त्याच दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध लहान बहीण रिंगणात आहे.